Shantanu Moghe - Priya Marathe News: संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर करून रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलेला अभिनेता म्हणजे शंतनू मोघे.
शंतनू मोघे विषयी एक खास बातमी समोर आलीय जी वाचून कलाकार म्हणून नक्कीच तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. शंतनूची बायको प्रिया मराठेने सोशल मीडियावर या खास गोष्टीचा खुलासा केलाय.
(marathi actor Shantanu Moghe safarchand play continued while leg fractured wife priya marathe revealed incident)
झालंय असं कि.. सफरचंद नाटकाचा प्रयोग नुकताच बोरिवलीमध्ये पार पडला. या प्रयोगाआधी एका महानाट्याच्या रिहर्सल दरम्यान शंतनूच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
डॉक्टरांनी हेयरलाईन फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. त्याच अवस्थेत शंतनूने महानाट्याचे प्रयोग केले. हे प्रयोग झाल्यावर शंतनू मुंबईत आला. मुंबईत त्याच्या सफरचंद नाटकाचे प्रयोग होते.
शंतनूच्या पायाला दुखापत झाली होती. ऐन वेळी प्रयोग रद्द झाला असता तर नुकसान होणं हे निश्चित होतं. याही परिस्थितीत शंतनूने नाटकाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
प्रयोग सुरु होण्यापूर्वी नाटकाचे निर्माते आणि सूत्रधार यांनी प्रेक्षकांना या गोष्टीची कल्पना दिली. शंतनू वॉकर घेऊन प्रयोग करेल असं सांगण्यात आलं.
प्रेक्षकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. दिग्दर्शकांनी शंतनुच्या केवळ दोन मुव्हमेंट्समध्ये बदल केले आणि ठरलेला प्रयोग व्यवस्थित पार पडला.
नाटक झाल्यावर जेव्हा कर्टन कॉलला सर्व कलाकारांची ओळख झाली तेव्हा शंतनूची स्टेजवर एंट्री होताच उपस्थित प्रेक्षकांनी उभं राहून शंतनूला दाद दिली आणि टाळ्यांचा कडकडाट केला.
शंतनू सुद्धा नाटकवेड्या प्रेक्षकांचं प्रेम बघून भारावून गेला.
या सर्व घटनेविषयी शंतनूची बायको आणि अभिनेत्री प्रिया मराठेने तिच्या भावना व्यक्त केल्यात. प्रिया म्हणाली..
Real hero! Hatts off वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत.. हे तूच करू जाणे.. तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम! ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते..
पाय fracture झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनू नी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..कमाल! आता तुला हाडाचा कलाकार म्हणता येईल..
अशाप्रकारे शंतनू मोघेवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.