Maharashtra Din: मराठी दिसणं, मराठी बोलणं अन्.. महाराष्ट्र दिनी सिद्धार्थची खरमरीत पोस्ट चर्चेत

सिद्धार्थ चांदेकरने महाराष्ट्र दिनी खास पोस्ट केल्या आहेत.
Maharashtra Day, Maharashtra Din Kamgar Din, Maharashtra Din 2023. Maharashtra Day 2023, ketaki chitale
Maharashtra Day, Maharashtra Din Kamgar Din, Maharashtra Din 2023. Maharashtra Day 2023, ketaki chitaleSAKAL
Updated on

Siddharth Chandekar on Maharashtra Din News: आज सगळीकडे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत आहे. आज सगळीकडे साजरा होणारा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा होत आहे. आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा महाराष्ट्र दिन.

मुंबई या द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्य असावी असा आग्रह मराठी आणि गुजराती लोकांनी धरला होता.

यावरूनच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची विभागणी करण्यात आली आणि स्वतंत्र महाराष्ट्र उदयास आले.

महाराष्ट्र दिनी अनेक मराठी कलाकार महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या पोस्ट करत आहेत. अशातच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत आहे.

(marathi actor siddharth chandekar special post on maharashtra din)

Maharashtra Day, Maharashtra Din Kamgar Din, Maharashtra Din 2023. Maharashtra Day 2023, ketaki chitale
Virat Kohli Birthday: एका शॅम्पूच्या जाहिरातीने एकत्र आणलं.. कशी आहे अनुष्का - विराटची लव्हस्टोरी पहा

सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. यात सिद्धार्थ चांदेकरने महाराष्ट्र दिनी खास पोस्ट केल्या आहेत.

सिद्धार्थ लिहितो, "जगातले सगळे पेहराव एका बाजूला आणि झब्बा सलवार, डोक्यावर फेटा आणि कपाळावर टिळा एका बाजूला. मराठी दिसणं, मराठी बोलणं आणि मराठी जगणं ह्याहून दुसरं सुख नाही, दुसरा अभिमान नाही.

सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा... जय महाराष्ट्र.." अशी पोस्ट सिद्धार्थ चांदेकरने लिहिली आहे.

Maharashtra Day, Maharashtra Din Kamgar Din, Maharashtra Din 2023. Maharashtra Day 2023, ketaki chitale
Maharashtra Din: किती जणांना मारून टाकण्यात आले? महाराष्ट्र दिनी केतकी चितळेच्या पोस्टची चर्चा

सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. सिद्धार्थ चांदेकर कायमच सोशल मीडियावर विशेष दिवसांबद्दल पोस्ट करत असतो.

लोकप्रिय अभिनेता असण्यासोबतच सिद्धार्थ समाजभान आणि आसपासच्या घडामोडींवर भाष्य करणारा अभिनेता आहे. सिद्धार्थच्या अभिनयासोबतच त्याच्या अशा पोस्टची सुद्धा चर्चा असते.

सिद्धार्थ चांदेकरने आजवर विविध सिनेमांमधून त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. झेंडा या सिनेमापासून सिद्धार्थने अभिनेता म्हणून मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं.

पुढे ऑनलाईन बिनलाईन, दुसरी गोष्ट, गुलाबजाम, क्लासमेट्स, वजनदार, झिम्मा अशा सिनेमांमधून सिद्धार्थने अभिनेता म्हणून दखलपात्र काम केलं. सिद्धार्थ चांदेकर लवकरच झिम्मा २ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेला झिम्मा सिनेमा प्रचंड गाजला होता. याच झिम्मा सिनेमाच्या पुढच्या भागात सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.