Maharashtra Din: गर्जा महाराष्ट्र माझा म्हणत कलाकारांनी जागवल्या महाराष्ट्र दिनाच्या खास आठवणी

महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांनी खास भावना व्यक्त केल्यात.
Maharashtra Day, Maharashtra Din Kamgar Din, Maharashtra Din 2023. Maharashtra Day 2023, suyash tilak, neha joshi, aroh velankar, hemangi kavi
Maharashtra Day, Maharashtra Din Kamgar Din, Maharashtra Din 2023. Maharashtra Day 2023, suyash tilak, neha joshi, aroh velankar, hemangi kavi SAKAL
Updated on

आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राचा गौरव करण्याचा दिवस. महाराष्ट्र दिनी अनेक मराठी सेलिब्रिटी मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा गौरव करताना दिसत आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांनी खास पोस्ट लिहिल्या आहेत.

सुयश टिळक

दिवसेंदवस महाराष्ट्र भरपूर प्रगती करत आहे. महाराष्ट्राबद्दल मी काय सांगणार, याविषयी काही बोलायला मी खूप लहान आहे. महाराष्ट्रीयन असल्याचा किंवा महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा नक्कीच अभिमान वाटतो.

मराठी संस्कृतीचं आपल्याकडे जेवढं वर्चस्व आहे, तितकीच इतर राज्यांची संस्कृतीदेखील आपल्याकडे जपली जाते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारखी जी महत्त्वाची शहरं आहेत, तिथे वेगवेगळ्या प्रांतांतील मंडळी एकत्र आली आहेत.

या महाराष्ट्राचा ही मंडळी एक भाग झाली आहेत, ज्यांना महाराष्ट्र नेहमीच आपलंसं करतो. मुंबईला स्वप्ननगरी म्हटलं जातं.

अनेक लोक या शहरात येऊन आपली स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ही खूप अभिमानाची बाब आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्र भरपूर प्रगती करत आहे, त्यामुळे कोणत्या क्षेत्रात मागे राहिला आहे असं नाही म्हणू शकत.

आरोह वेलणकर

महाराष्ट्रात चांगल्या स्टार्टअपच्या संधी आहेत. आपल्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा जीडीपी खरंच चांगला आहे.

सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने चांगली प्रगती केलेली आहे. मी स्वतः बिझनेस करतो. त्यामुळे मला माहीत आहे किती चांगल्या प्रकारच्या स्टार्टअपच्या संधी महाराष्ट्रात आहेत. ऑफिसच्या कामानिमित्त माझं इतर राज्यांमध्येदेखील फिरणं होतं.

मुंबई-पुण्यात कितीही रात्री फिरलो तरी मला सुरक्षित वाटतं, जे दिल्लीत नाही वाटत. मी पुण्यात जन्मलो आणि वाढलो आहे. माझी मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहतो याचा मला अभिमान आहे.

राजकारणात महाराष्ट्र काहीसा मागे राहिलेला आहे. महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण हे खूपच गढूळ झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे समाजाच्या तसेच लोकांच्या दृष्टीने सुधारलं पाहिजे.

Maharashtra Day, Maharashtra Din Kamgar Din, Maharashtra Din 2023. Maharashtra Day 2023, suyash tilak, neha joshi, aroh velankar, hemangi kavi
Maharashtra Din: छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दैवत अवतरलं अशा.. हेमांगीची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट

शुभांगी अत्रे

आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकांना एकत्र आणणारा दिवस आहे. जो राज्‍याचा संयुक्‍त इतिहास, संस्कृती यांची ओळख करून देतो.

महाराष्ट्रात अजिंठा लेणी, एलोरा लेणी यांसारखी अनेक प्रमुख ऐतिहासिक स्थळे आहेत. त्याचबरोबर साहित्यिक, सांस्कृतिक, संगीत व चित्रपटातील योगदानासाठी प्रसिद्ध आहे.

या शुभदिनी महाराष्ट्राची अनोखी संस्कृती व वारसा जतन आणि संवर्धन केला जातो. तसेच आजच्या दिवसापासून राज्य व राज्‍यामधील लोकांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्न करू या. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

हेमांगी कवी

महिलांची सुरक्षा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे नक्कीच मला महाराष्ट्राचा अभिमान वाटतो; त्याचं सुरक्षा हे एक कारण आहे.

बाकीच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मला खूप सुरक्षित वाटतं. महिलांचा आदर करणं, त्यांची सुरक्षा करणं असा आपला इतिहाससुद्धा आहे. शैक्षणिकदृष्ट्यादेखील आपला महाराष्ट्र खूप पुढे आहे ही एक छान गोष्ट आहे.

औद्योगिक क्षेत्रात जेवढी प्रगती हवी तेवढी महाराष्ट्रात झालेली नाहीय. मी मुंबईत राहते. मुंबईत मराठी माणसाचा उद्योग, व्यवसाय जसा असायला हवा तसा अजून तरी दिसत नाही. त्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत.

त्याशिवाय साहित्यिक, सांस्कृतिक गोष्टींसाठी मला महाराष्ट्राचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे. मुंबई महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग आहे.

मराठी माणसांसाठी जास्तीत जास्त उद्योग उपलब्ध करून दिले पाहिजेत. बाकी खेळ, संस्कृती, पर्यावरण या सर्वच गोष्टींमध्ये आपण नेहमीच पुढाकार घेत असतो.

Maharashtra Day, Maharashtra Din Kamgar Din, Maharashtra Din 2023. Maharashtra Day 2023, suyash tilak, neha joshi, aroh velankar, hemangi kavi
Sairat: इतिहास घडवणाऱ्या 'सैराट'ला झाली ७ वर्ष, बघा कधीही न पाहिलेले फोटो

नेहा जोशी

मी नाशिकमधून आले आहे. जे महाराष्ट्राचे प्राचीन शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि अनेक मराठा योद्धे व व्यक्तिमत्त्वांचे घर आहे.

देशातील सर्वांत स्मार्ट शहरांपैकी एक बनून शहराची गेल्या काही वर्षांमध्ये झालेली प्रचंड वाढ पाहून मला आश्‍चर्य वाटते.

माझ्या कामामुळे मी अनेकदा मुंबई ते नाशिक प्रवास केला आहे, ज्‍यामुळे मुंबई माझे दुसरे घर बनले आहे. मी या शहराची ऋणी आहे, ज्याने मला प्रसिद्धी, ओळख आणि आपुलकी दिली.

व्यावसायिक राजधानी असण्याव्यतिरिक्त शहर कला, नाट्य आणि मनोरंजनाचे केंद्र आहे. महाराष्ट्राचा एक अभिमानी नागरिक म्हणून मला आपल्या राज्याचा सांस्कृतिक वारसा, गौरवशाली इतिहास आणि प्रगतीचा खूप अभिमान आहे. माझ्याकडून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.