Bhagyaashreee Mote: बहिणीच्या मृत्यूबाबत मराठी अभिनेत्रीला संशय; म्हणाली, 'माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर..'

Bhagyaashreee Mote
Bhagyaashreee Mote
Updated on

अभिनेत्री भाग्यश्री मोटेला तिच्या बहिणीच्या मृत्यूबद्दल मोठा बसला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. भाग्यश्रीर दुख:चा डोंगर कोसळला आहे. भाग्यश्रीची बहीण आता या जगात नाही, त्यामुळे तिला मोठा धक्का बसला आहे. भाग्यश्रीची बहीण मधु मार्कंडे हिचे निधन झाले.

अभिनेत्रीची बहीण मधु हिचा मृतदेह पिंपरी चिंचवड वाकड परिसरात सापडला होता. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मधुचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला होता. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. भाग्यश्रीने बहिणीच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे. 

भाग्यश्री काय म्हणाली?

भाग्यश्री म्हणाली, हे धमक्या देण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी नाही. माझ्या अंतःकरणापासून मी सत्य सांगत आहे. १२ मार्च रोजी रविवारी सकाळी माझी बहीण केक बनवण्याचे सामान आणि दोन तयार केलेले केक घेऊन एका केक वर्कशॉपसाठी बाहेर गेली होती. ३ ते ४ महिन्यांपासून तिचे काम करत होती. आमच्या माहितीनुसार तिला ५ महिलांसोबत कार्यशाळा घ्यायची होती. 

आता त्याच स्त्रिया सांगत आहेत की त्या दोघी खोली शोधत बाहेर पडल्या होत्या. रस्त्यात एका खोलीसाठी त्यांना बोर्ड लागलेला दिसला. त्यांनी मालकाशी संपर्क केला. त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांचे तिथे त्यांचे अर्धा तास संभाषण झाले. त्यावेळी माझी बहीण अचानक खाली पडली आणि तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र तिची नाडी लागली नाही. तेव्हा तिला खासगी हॉस्पिटलमध्ये घेतले नाही. जेव्हा तिला वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा तिला एका तासापूर्वी मृत झाल्याचे करण्यात आले. 

Bhagyaashreee Mote
Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

माझी बहीण सर्व काही खात्री करून निश्चित केलेल्या कार्यशाळेसाठी गेली याचा स्पष्ट पुरावा आहे. एक दिवस आधी तिला त्यासाठी अॅडव्हान्स देखील मिळाला होता. माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि डॉक्टरांनी याची पुष्टी केली होती. ज्या प्रकारे सर्व काही घडले ते पूर्णपणे संशयास्पद आहे. ते जिथे गेले ते ठिकाण खूपच कमी गर्दीचे आहे. संपूर्ण वसाहतीत सीसीटीव्ही नाहीत. माझ्या बहिणीने खोली भाड्याने घेतली होती आणि व्यवसायासाठी तिचे ते एक आरक्षित कार्यालय होते. आर्थिक मदतीसाठी तिने प्रथम कार्यशाळेची ऑर्डर घेतली होती.

इतके दिवस आणि इतके स्पष्ट पुरावे मिळूनही याप्रकरणी कारवाई का झाली नाही हे मला स्पष्टपणे समजत नाही. दिशाभूल करणारी आणि चुकीचे माहिती पसरली आहे. मला कोणतेही स्पष्ट उत्तरे मिळत नाहीत. मी माझ्या बहिणीसाठी न्याय मागते, असे भाग्यश्रीने म्हटले आहे. 

Bhagyaashreee Mote
Jaya Prada: जया प्रदा पोहचल्या महाकालच्या चरणी! पंतप्रधान मोदींचे मानले आभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.