Deepa Parab: वयाच्या चाळीशीनंतर कमबॅक करताना.. दीपानं सांगितला 'तो' खास अनुभव...

सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं...' मालिकेत अश्विनी या मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
 deepa parab
deepa parabSakal

Actress Deepa parab Podcast: झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं...' मालिकेत अश्विनी या मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. दीपाने अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा मालिकेतून पदार्पण केले आहे.

दीपाने तिला वयाच्या चाळीशीनंतर कमबॅक करताना नेमका काय फरक जाणवतो किंवा यानं अभिनेत्री म्हणून काम करताना फरक पडतो का यावर ती खुलेपणाने बोलली. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत दीपा तिच्या वयाच्या चाळीशीनंतर कमबॅक करताना आणि तिच्या मालिकेबद्दल बोलली आहे.

 deepa parab
Podcast: 'डिलाईल रोडचा 'तो' बसस्टॉप आणि आम्ही दोघं..', दीपा परबनं सांगितली अंकुश सोबतची खास आठवण

वयाच्या चाळीशीनंतर कमबॅक करताना नेमका काय फरक जाणवतो किंवा यानं अभिनेत्री म्हणून काम करताना फरक पडतो असं विचारण्यात आल्यावर यावर दीपानं थेट भाष्य केलं आहे. ती म्हणाली, "मी ठरवून ब्रेक घेतला होता, प्रत्येक गोष्टीला वेळ देणं खूप महत्वाचं असतं.

आणि माझ्या मुलासाठी मला वेळ देणं खूप महत्वाचं होतं, पण त्याचबरोबर या क्षेत्रापासून लांब गेले असं म्हणता येणार नाही. कारण अंकुशसुद्धा याच क्षेत्राचा असल्यामुळे सतत चर्चा आणि या गोष्टी होतात. आणि मला माहित होतं की मी परत येणार, मला करायचंय मी फक्त संधी ची वाट बघत होते. आणि मला ती संधी मिळाली".

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com