Hemangi Kavi on Maharashtra Din News: हेमांगी कवी ही सोशल मीडियावर विविध पोस्ट्सच्या माध्यमातून चर्चेत असतो.
हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय या पोस्टमध्ये हेमांगीने महाराष्ट्र दिनी खास पोस्ट केलीय.
हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय. हेमांगीने तिचा निसर्गाच्या सानिध्यातला फोटो पोस्ट केलाय.
(marathi actress hemangi kavi viral post on chhatrapti shivaji maharaj and maharashtra )
हेमांगी लिहिते.. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा ‘महाराष्ट्र’ माझा! माझा जन्म महाराष्ट्रासारख्या देखण्या, रुबाबदार, खाण्या-पिण्याच्या, पेहरावाच्या, भाषेच्या, रितीचालींच्या,
संस्कृतीच्या विविधतेने नटलेल्या, शैक्षणिक, भौगोलिक, नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक गुणांनी बहरलेल्या राज्यात झाला.
ज्या भूमीत संतानी जन्म घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दैवत अवतरलं, अनेक क्रांतिकारी, समाज सुधारक,
महामानवांमुळे व्यक्ती म्हणून आणि स्त्री म्हणून ही माझं जगणं सुसह्य झालं त्या भूमीचा, त्या राज्याचा मला कायम अभिमान असणार आहे. या राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेमुळे मला कायम सुरक्षित वाटत आलंय.
हेमांगी पुढे लिहिते.. माझी कर्मभूमी पण हीच. मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना होण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आहुती दिली त्यांना त्रिवार अभिवादन.
आपली जबाबदारी एवढीच की हे जे विविध अंगांनी संपन्न असलेले राज्य आहे ते आपआपल्या परीने वाढवूया, वाढवता नाही आलं तर निदान जपूया! कुठली ही धार्मिक, जातीय, प्रांतीय तेढ निर्माण न करता अखंड महाराष्ट्र म्हणूगुण्यागोविंदाने नांदूया!
कारण महाराष्ट्र हे केवळ राज्य नाही तर ती एक भावना आहे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा!
याशिवाय याच पोस्टमध्ये हेमांगी लिहिते.. "त.टी. : सदर post मधली मोजकीच वाक्य उचलून, अर्धवट headlines देऊन ‘click bait’ मिळवण्यासाठी
कुठल्याही प्रकारचा नकारात्मक रंग येईल अशी ‘बातमी’ करू नये ही Online news portal मंडळाला नम्र विनंती!" अशा प्रकारे हेमांगीने महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा दिल्यात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.