केतकी चितळे का घेतीये इलेक्ट्रिक शॉक ट्रिटमेंट?

'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेमुळे केतकीला विशेष लोकप्रियता मिळाली.
marathi actress ketaki chitale take electric shock in the hospital
marathi actress ketaki chitale take electric shock in the hospitalfile image
Updated on

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेमुळे केतकीला विशेष लोकप्रियता मिळाली. केतकी सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच केतकीने हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला. या फोटोमध्ये हॉस्पिटलचा ड्रेस घातलेला दिसत आहे.(marathi actress ketaki chitale take electric shock in the hospital)

केतकीला एपिलेप्सी म्हणजे अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेत असते. नुकतीच तिने 'इलेक्ट्रिक शॉक' ही ट्रिटमेंट घेतली. इलेक्ट्रिक शॉक घेण्याआधी आणि घेतल्यानंतरचा व्हिडीओ केतकीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. केतकीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हॉस्पिटलमधील लोक तिचे केस बांधताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये केतकी इलेक्ट्रिक शॉक ट्रिटमेंटची माहिती देत आहे. ट्रिटमेंट झाल्यानंतर चेहऱ्यांवर झालेल्या जखमांबद्दल केतकीने व्हिडीओमध्ये माहिती दिली आहे. तिने सांगितले की, 'माझी स्किन खूप नाजूक आहे. त्यामुळे मला जखमा झाल्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही का ही ट्रिटमेंट घेण्याऱ्या प्रत्येक व्यक्तिला या जखमा होतात. त्यामुळे या ट्रिटमेंटला घाबरू नाका.'

काय आहे एपिलेप्सी?

एपिलेप्सीला अपस्मार असे म्हणतात. फिट येणे ,आकडी, मिरगी, अपस्मार म्हणजेच एपिलेप्सी. या आजारात रूग्णाला कधीही अचानक झटका येऊ शकतो. हा आजार मेंदूशी निगडीत आहे. एपिलेप्सिबद्दल केतकी अनेक समाज प्रबोधनात्मक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर करत असते. या पोस्टमधून ती एपिलीप्सी आजारबद्दलची माहिती नेटकऱ्यांना देते. काही दिवसांपूर्वी 'एक्सेप्ट एपिलेप्सी' नावाचा बॅंड घालून केतकीने फोटो शेअर केला होता. केतकीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटचे नाव 'एपिलेप्सी वॉरिअर क्विन' असे आहे.

marathi actress ketaki chitale take electric shock in the hospital
'सत्यनारायण की कथा'वरुन वाद; समीर विद्वांसचा मोठा निर्णय
marathi actress ketaki chitale take electric shock in the hospital
'बेडवर असे पडून रहा..'; हटके फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.