Megha Ghadge: "किंग कोरोना परत आलाय!", हॉस्पीटलमधून व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने व्यक्त केली काळजी

मराठमोळी अभिनेत्री मेघा घाडगेने हॉस्पीटलमधून व्हिडीओ शेअर केलाय
Marathi Actress Megha Ghadge expressed Concern about new Corona Variant
Marathi Actress Megha Ghadge expressed Concern about new Corona VariantSAKAL
Updated on

Megha Ghadge News: लावणीसम्राज्ञी आणि अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. मेघा बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी होती.

मेघाने अनेक सिनेमांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय एक लावणीसम्राज्ञी म्हणूनही मेघाची ओळख आहे. अशातच मेघाच्या चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे. मेघाने हॉस्पीटलमधून एक व्हिडीओ शेअर केलाय. काय झालंय नेमकं. जाणून घ्या.

Marathi Actress Megha Ghadge expressed Concern about new Corona Variant
Animal OTT Release Date: आता रणबीरचा 'अ‍ॅनिमल' घरबसल्या पाहता येणार, कधी? कुठे? वाचा एका क्लिकवर

मेघाने व्यक्त केली कोरोनाची भीती!

मेघाने सध्या हॉस्पीटलमध्ये दाखल आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की, "बुखार … ! 31st येतोय .. किंग करोना परत आलाय please काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो 2024 ची तुम्हा सर्वांना निरोगी आणि सुख, समृद्धी , भर भरभरून यश मिळो ..!"

मेघाचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना काळजी वाटली. अनेकांनी तिला काळजी घ्यायला सांगितली असून लवकरात लवकर बरी व्हायला सांगितलं आहे.

मेघाचं वर्कफ्रंट

मेघाने २०२२ ला बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग नोंदवला होता. या सीझनमध्ये मेघाने फायनलपर्यंत मजल मारली नाही तरीही तिच्या खेळाची चर्चा झाली. मेघा - अपूर्वा नेमळेकर - किरण माने - त्रिशूल मराठे यांची मैत्री चांगलीच गाजली.

मेघा सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नसून ती तिच्या लावणीचे जाहीर शो महाराष्ट्रात करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()