Namrata Sambherao News: महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रता काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेत गेली असून तिथे नम्रताने कुर्रर्रर्र नाटकाचे प्रयोग केले.
नम्रता सोबत अभिनेत्री विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे आणि प्रसाद खांडेकर सुद्धा होते. सध्या या चौघांचं कुर्रर्रर्र नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजत आहे. अमेरिकेत असताना नम्रताने तिचं एक खास स्वप्न सांगितलं आहे. ते म्हणजे ऑस्कर..
(Namrata Sambherao from maharashtrachi hasyajatra goes Oscars award theatre in LA california)
नम्रताला थेट ऑस्कर पुरस्कारांचे वेध लागले आहेत. नम्रताने कॅलिफोर्निया मधील लॉस एंजिलीस येथील डॉल्बी थेटरच्या बाहेर फोटो काढलाय. नम्रता या फोटोत टी शर्ट आणि जीन्स, डोळ्यावर गॉगल या मॉडर्न अवतारात दिसतेय.
नम्रताने हा फोटो पोस्ट करताना एक खास कॅप्शन लिहिलंय. नम्रता लिहीते.. "इथे ऑस्कर सोहळा पार पडतो लवकरच इथे पाय रोवायचेत.. स्वप्न." असा खुलासा करत नम्रताने कधीतरी ऑस्कर सोहळ्यात येण्याचं स्वप्न उलगडलं आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेत नम्रताने साकारलेली 'लॉली' असो, 'आई' असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले 'पावली' हे पात्र असो.
तिच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला हसवलं आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
नम्रताने काहीच दिवसांपूर्वी कुर्रर्रर्र नाटकाच्या अमेरिका दौऱ्याबद्दल माहिती सांगितली होती
त्यावेळी लाडका मुलगा रुद्राजला भारतात सोडून जाताना नम्रता भावुक झालेली. ती आपल्या बाळा विषयी म्हणजे रुद्र विषयी खूप लिहीत असते. शूटिंगमुळे त्याला वेळ देता येत नाही याबाबतही ती अनेकदा बोलत असते.
चक्क महिन्या भरासाठी कुर्रर्रर्र च्या निमित्ताने ती आपल्या बाळाला सोडून बाहेर चालली होती तेव्हा तिने मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
गेल्या वर्षी २०२२ ला 'कुर्ररर' हे नाटक रंगभूमीवर दाखल झालं. सध्या या नाटकाची बरीच चर्चा आहे. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनेच केलं असून विशाखा सुभेदार या नाटकाची निर्माती आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.