Spruha Joshi : १२ वर्षांची मेहनत वाया, स्पृहा जोशीचं यु ट्यूब चॅनल हॅक

२०११ ला स्पृहाने स्वतःचं यु ट्यूब चॅनल सुरु केलं
spruha joshi, lokamanya
spruha joshi, lokamanyaSAKAL
Updated on

स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री. स्पृहा जोशीची केवळ एक अभिनेत्री म्हणून ओळख नाही. तर एक उत्तम निवेदिका आणि एक कवयित्री म्हणून सुद्धा तिला ओळखले जाते. स्पृहाचं स्वतःचं एक युट्यूब चॅनेलही आहे. २०११ ला स्पृहाने स्वतःचं यु ट्यूब चॅनल सुरु केलं. पण काही दिवसांपूर्वी यु ट्यूब स्पृहाचं चॅनल हॅक झालंय. त्यामुळे स्पृहाची १२ वर्षांची मेहनत वाया गेली आहे.

spruha joshi, lokamanya
अवखळ स्पृहा! आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीही महत्वाच्या असतात : Spruha Joshi

स्पृहा जोशीचं स्वतं:चं युट्यूब चॅनल आहे.. ‘स्पृहा जोशी’ हे तिच्या यु ट्यूब चॅनेलचं नाव आहे. २०११ ला स्पृहाने हे चॅनल सुरु केलं. स्पृहा स्वतःच्या कविता, मुलाखती अशा विविध गोष्टी यु ट्यूब चॅनल वर अपलोड करत असते. गेल्याच वर्षी स्पृहाच्या या चॅनलने १ लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा पार केला. परंतु गेल्या अनेक दिवसांमध्ये तिने एकही व्हिडीओ या चॅनलवरून शेअर केला नव्हता. त्यामुळे स्पृहाचे चाहते तिला सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारत होते.

परंतु स्पृहाने नुकतंच सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या फॅन्सना याविषयी माहिती दिली आहे. स्पृहाचं यु ट्यूब चॅनल हॅक झालंय. त्यामुळे स्पृहाची १२ वर्षांची मेहनत वाया गेली असती. स्पृहाचं यु ट्यूब चॅनल डिलीट झालेलं. त्यामुळे स्पृहाला मोठा धक्का बसलेला. पण स्पृहाच्या टीमने अथक मेहनत केली. आणि त्यामुळे स्पृहाला तिचं चॅनल पुन्हा परत मिळालं आहे. स्पृहाने यासाठी तिच्या फॅन्सचे आणि तिच्या टीमचे आभार मानले .

spruha joshi, lokamanya
Shreyas Talpade: पुष्पा फुल नही फायर! श्रेयस तळपदेच्या तळपायाची आग मस्तकात

स्पृहा सध्या झी मराठीवरील 'लोकमान्य' मालिकेत अभिनय करत आहे. लोकमान्य मालिकेत स्पृहा लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामा यांची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने स्पृहा जवळपास ८ वर्षांनी मालिका विश्वात परतली आहे. अभिनेता क्षितिश दाते या मालिकेत लोकमान्य टिळकांची भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.