थिएटर सुरु करण्यासाठी नाट्यगृहाबाहेर रंगकर्मींची 'महाआरती'

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातील अडचणी वाढू लागल्या आहेत
थिएटर सुरु करण्यासाठी नाट्यगृहाबाहेर रंगकर्मींची 'महाआरती'
Updated on

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यातील एक प्रमुख अडचण म्हणजे थिएटर चालकांना अजूनही थिएटर सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. परवानगी मिळावी म्हणून यापूर्वी अनेकदा कलाकारांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे. मात्र निवेदनं घेऊनही त्यावर कोणताच विचार झालेला नाही. असं दिसून आलं आहे. त्यामुळे येत्या काळात कलाकार मंडळी आक्रमक पवित्रा घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यानच्या काळात अजूनही सौम्य पद्धतीनं सरकारला विनंती करण्याचं काम सुरु असल्याचं दिसून आलं आहे.

कोरोनाची corona दुसरी लाट second phase ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रशासनानं पूर्ण तयारीही केली आहे. वेगवेगळ्या स्तरांवर त्याची चाचणीही करण्यात आली आहे. वैद्यकीय सोयीसुविधा, औषधोपचाराकरिता प्रशासकीय पातळीवर चर्चाही सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून थिएटर theater सुरु करण्यासाठी कलाकार मंडळींकडून प्रशासनाशी चर्चा सुरु आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले आहे. अशावेळी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात बॅकस्टेज आर्टिस्ट back stage artist यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं.

आता राज्यभरातील रंगकर्मींनी आपल्या विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्ट रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याशी रंगकर्मींच्या एका शिष्टमंडळाची चर्चा झाली होती. तेव्हा मंत्री महोदयांनी या मागण्या सोडविण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप काहीच हालचाल झाली नसल्यामुळे आता रंगकर्मी ३० आॅगस्ट रोजी नाट्यगृहासमोर महाआरती करणार आहेत. चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहे १ सप्टेंबरपासून सुरू होतील असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी रंगकर्मींची चर्चा झाली होती. परंतु अद्याप चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे रंगकर्मी शिवाजी मंदिरच्या गेटसमोर ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता महाआरती करणार आहेत. पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहासमोर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत महाआऱती करण्यात येणार आहे, अशी माहिती रंगकर्मी हरी पाटणकर यांनी दिली.

थिएटर सुरु करण्यासाठी नाट्यगृहाबाहेर रंगकर्मींची 'महाआरती'
तामिळनाडूमध्ये आजपासून थिएटर सुरु, महाराष्ट्रात कधी?

यापूर्वी काही कलाकारांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. लॉकडाऊनचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला होता. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. त्यामुळे त्यांना नाइलजानं ओटीटीचा पर्याय स्वीकारला होता. अनेक मोठ्या निर्मात्यांनी ओटीटीवर आपले चित्रपट प्रदर्शित केले होते. त्यालाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. येत्या काळातही मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र ते थिएटरमध्ये प्रदर्शित होणार की ओटीटीवर याबाबत अजून संभ्रम आहे. त्यामुळे सरकारशी चर्चा करुन निर्माते, दिग्दर्शक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.