Raj Thackeray News : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मुंबईत पार पडलेल्या त्या सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या (Marathi Bhasha Gaurav Din 2024) शैलीत मराठी भाषा, मराठी चित्रपट या विषयी महत्वाचे भाष्य केले आहे. सद्यस्थितीला आपण आपली भाषा आणि चित्रपट याकडे मराठी भाषिकांचे लक्ष वेधण्यासाठी काय करु शकतो यावर मत व्यक्त केलं आहे.
राज म्हणाले की, महाराष्ट्रात पंधरा कोटी लोकं आहेत. यात दीड ते पावणे (Raj Thackeray Latest news) दोन कोटी अमराठी आहेत. एखाद्या युरोप देशाच्या लोकसंख्येपैकी जास्त लोकसंख्या एकट्या महाराष्ट्राची आहे. असं असताना देखील एका ठराविक नाटकाला किंवा सिनेमालाच (Marathi Movie) प्रेक्षकांची गर्दी का होते? बाकीच्या नाटकांना, चित्रपटांना गर्दी का होत नाही, हे सगळं चित्र बदलणं गरजेचं आहे.
जे मला टेलिव्हिजन चॅनेलवर पाहायला मिळतं ते मी तिकीट काढून (Hollywood Tv Serise) थिएटरमध्ये पाहायला जाणार नाही. याच्या व्यतिरिक्त मला काही नव्यानं पाहायला मिळणार असेल तर थिएटरमध्ये जाणं होईल. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट आदळताना दिसत आहे. लोकांना तोच तोचपणा आवडत नाही. यावर राज ठाकरे यांनी जे उदाहरण दिले होते ते चर्चेत आले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, तीस एक वर्षांपूर्वी महाराष्ट्रातले राजकारणी म्हणायचे की, आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करु. यावर लोकं भरघोस मतदान करायची. पण ज्या दिवशी त्यांनी टेलिव्हिजनवर बेवॉच नावाची (Baywatch Serise) सीरिज पाहिली आणि त्यात जे आहे ते आपल्याकडे ते दिसत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना कळलं की आपल्याला मूर्ख बनवलं जातंय. त्यानंतर कुणीही म्हटलं नाही की आम्हाला कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे म्हणून... राज यांच्या त्या फटकेबाजीवर श्रोत्यांनी त्यांना खळखळून दाद दिली.
या सगळ्यात राज यांनी ज्या मालिकेचा उल्लेख केला ती बेबॉच नावाची सीरिज आहे तरी काय याविषयी आपण जाणून घेणार आहोत. टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या मालिकेनं प्रेक्षकांना वेडं केलं होतं त्या बेवॉचची क्रेझ अजुनही कायम असल्याचे दिसून आले आहे. क्लासिक बीच ड्रामा म्हणून त्या मालिकेकडे पाहिले जाते.
ओरिजनल बेबॉच नावाची सीरिज ही १९८९ मध्ये प्रदर्शित झाली होती. पुढे अकरा वर्षात या मालिकेचे १३ सीझन प्रदर्शित झाले. मायकेल बर्क, डग्लस श्वार्झ आणि जॉर्जरी बोनमन यांनी ही मालिका तयार केली होती. समुद्रकिनारी पर्यटकांची काळजी आणि त्यांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या लाईफ गार्डची स्टोरी या मालिकेतून मांडण्यात आली होती.
एल ए देशामध्ये लांबवर पसरलेला समुद्रकिनारा आणि त्या किनाऱ्यावरील ते लाईफगार्डस त्यांच्या गोष्टी, पर्यटक आणि लाईफगार्डस यांच्यातील संघर्ष मालिकेच्या माध्यमातून उलगडण्यात आला होता. त्या मालिकेनं प्रेक्षकांची मोठी लोकप्रियता मिळवली. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चाही व्हायरल झाल्या होत्या. कित्येकांनी त्या मालिकेवरुन टीकाही केली होती. मात्र तरुणाईच्या सर्वाधिक पसंतीची मालिका म्हणून नेहमीच बेवॉचचे नाव घेतले गेले.
या मालिकेमध्ये डेव्हिड हॅसलऑफ, पामेला अँडरसन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तसेच डेव्हिड चार्वेट, यस्मिन ब्लिथ आणि निकोल इर्गट यांच्याही भूमिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.