Sonali Kulkarni : 'डिस्टब्र न होता...', 'देऊळ' फेम सोनाली कुलकर्णीच्या पोस्टनं वेधलं लक्ष!

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonali Kulkarni Latest News) त्या पोस्टची चर्चा होताना दिसतेय.
Sonali Kulkarni Latest news
Sonali Kulkarni Latest newsesakal
Updated on

Sonali Kulkarni News : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आज मराठी मनोरंजन विश्वातून अनेक सेलिब्रेटींनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Marathi Bhasha Gaurav Din 2024) माय मराठी भाषा,तिचं महत्व आणि तिचं कौतुक करत भाषेविषयीची अनेक वैशिष्ट्य यावेळी नेटकऱ्यांना, वाचकांना सांगण्यात आली आहेत.

या सगळ्यात आता प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पोस्टनं वाचकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे (Sonali Kulkarni Marathi Actress News) दिसून आले आहे. तिनं फेसबूकवर काही वेळेपूर्वी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं खास पोस्टही शेयर केली आहे. त्यात ती म्हणते, मातृभाषा घरी आनंदानं नांदते आहे, चुकतमाकत शिकते आहे.. बहरते आहे.. डिस्टब्र न होता लोभ असावा ही विनंती..

यावेळी सोनालीनं फेसबूकवर काही फोटोही शेयर केले आहेत. त्यात (sonali facebook post news) दारावर मराठी भाषेत लिहिलेला मेसेज आणि तो वाचून नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटस भन्नाट आहेत. नेटकऱ्यांनी मराठी दिनाच्या निमित्तानं मराठी भाषा सद्यस्थिती आणि वास्तव यावर आधारित प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं अनेक सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या पोस्ट करुन चाहत्यांना जिंकून घेतले आहे. यात अभिनेता स्वप्नील जोशी, अभिजित केळकर, नटरंग फेम सोनाली कुलकर्णी या सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे.

Sonali Kulkarni Latest news
Marathi Bhasha Din: मराठी भाषा शब्दकोष काढणारा राजा...;राज ठाकरेंच्या आवाजातील व्हिडिओ मनसेकडून ट्विट

दुसरीकडे मुंबईमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या खास शैलीत मराठी भाषा दिन आणि त्याचे महत्व समजावून सांगितलं आहे. एका ठराविक मराठी चित्रपट अथवा नाटकालाच गर्दी का होते, असा प्रश्न विचारत आता आपल्याला यात बदल करावा लागेल. असेही त्यांनी प्रेक्षकांना, मराठी भाषकांना सुचवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.