sangeet devbabhali : गेल्या काही वर्षात व्यावसायिक रंगभूमीवर आलेले 'संगीत देवबाभळी' हे नाटक रोज नवा विक्रम रचत आहे. या नाटकाने नाट्य स्पर्धांमध्ये तर बाजी मारलीच शिवाय काही दिवसांपूर्वीच 'साहित्य अकादमी' पुरस्कारही या नाटकाला प्राप्त झाला. आता एक आनंदाची बातमी समोर आली, ती म्हणजे संगीत देवबाभळी हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या 'बीए' अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
(marathi drama Sangeet Devbabhali in BA syllabus of University of Mumbai writer prajakt deshmukh bhadrakali production)
हे नाटक 22 डिसेंबर 2017 मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर आले. या आधी हे नाटक महाविद्यालयीन एकांकिका म्हणून सादर झाले होते. व्यावसायिक रंगभूमीवर आल्याने या नाटकाची ओळख सातासमुद्रापार गेली. ही किमया आहे अर्थात नाटकाचे लेखक - दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याची. अत्यंत कमी वयात त्याच्या नाटकाने अनेक विक्रम केले. या नाटकाची निर्मिती प्रसाद कांबळी यांच्या प्रॅाडक्शनने केली आहे. 'संगीत देवबाभळी' या नाटकाला 2018 मध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळाले तर आजवरच्या नाटकाच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढत या नाटकाने 42 पुरस्कार मिळवले आहे.
अत्यंत वेगळा विषय आणि वास्तवासोबत अध्यात्माची घातलेली अनोखी सांगड यामुळे हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. बीए मराठी प्रथम वर्षासाठी हे पुस्तक २०२२ पासून अभ्यासक्रमाला असेल. पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेले 'संगीत देवबाभळी' हे पुस्तक आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग होणार आहे.
'भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकोबांना भाकरी द्यायला गेलेली नि काटा रूतून बेशुद्ध झालेली आवली आणि तिला लखुबाई बनून घरी घेऊन येणारी साक्षात रखुमाई यांच्यातील अनोख्या संवादातून लौकिक अलौकिक नात्याची वीण प्राजक्त देशमुख यांनी या नाटकात रेखटली आहे. देवत्व लाभलेल्या राखुमाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. या नाटकात अभिनेत्री मानसी जोशी हिने राखुमाईची तर अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने आवलीची भूमिका साकारली आहे. विजया मेहता, स्व. जयंत पवार , डॅा. राजीव नाईक, सतीश आळेकर, नसिरुद्दीन शाह, परेश रावल, दिलीप प्रभावळकर आणि अशा अनेक दिग्गजांनी या नाटकाला गौरवले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.