थरकाप उडवणारी लव्हस्टोरी.. 'लगन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

ग्रामीण भावविश्वातील अनोखी प्रेमकथा उलगडणारा 'लगन' लवकरच येतोय आपल्या भेटीला..
lagan marathi movie
lagan marathi moviesakal
Updated on

प्रेम हा सामायिक धागा ठेवून आजवर अनेक चित्रपट तयार करण्यात आले. किंबहुना चित्रपट म्हंटलं की लव्हस्टोरी आलीच. हल्ली ग्रामीण जीवनात घडणाऱ्या प्रेमकथा, त्यातील संघर्ष चित्रपटातून प्रकर्षाने पुढे येत आहे. अशीच एक आगळी वेगळी कहाणी घेऊन 'लगन' हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटात स्मिता तांबे महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

lagan marathi movie
अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात राष्ट्रभाषेवरुन वाद.. म्हणाले, हिंदी..

स्मिता तांबेने या चित्रपटात ऊसतोड कामगाराची भूमिका केली असून काही दिवसापूर्वीच तिचा लुक रिव्हिल झाला होता. आता आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'प्रेमात पडण्यापेक्षा प्रेमभावना जपण्यात जास्त सुख असतं,' हा मध्यवर्ती विचार देणारा ‘लगन’ हा मराठी चित्रपट ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. जी. बी एंटरटेंन्मेंटने या चित्रपटाची निर्मीती केली असून दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांचे आहे. ‘लगन’ चित्रपट प्रत्येकाला प्रेमाचा खरा अर्थ दाखवून देईलच सोबत प्रेक्षकांची मने जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास सर्व कलाकारांनी ट्रेलर लॉन्च सोहळ्यात व्यक्त केला. ‘तुमचं ना..रडू लय जवळ असतं.. अन् तेच आमचा जीव घेतं’ अशी हळुवार टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात संघर्षावर मात करत प्रेम निभावणाऱ्या प्रेमवीरांची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

lagan marathi movie
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले, अजय देवगणचा समाचार

सुजित चैारे आणि श्वेता काळे ही नवी युवा जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. यात प्रेम करणाऱ्या दोन जीवांवर समाजाकडून अनेक बंधन लादली जात असल्याचे ट्रेलर वरून समजते. ही जातीय आणि सामाजिक दरी अधोरेखित करण्याचा आणि ओलांडण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. या चित्रपटात स्मिता तांबे, प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे,अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ असे अनेक दिग्गज कलाकार आहेत.

‘लगन’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.