Satyashodhak Movie Review: बायोपिक म्हटले कि सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जातेच तरीही... कसा आहे 'सत्यशोधक'?

Satyashodhak Movie Review: बायोपिक म्हटले कि सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जातेच तरीही... कसा आहे 'सत्यशोधक'?
Updated on

`सत्यशोधक' पाहिला. हा मराठी चित्रपट शहरात दोनतीन ठिकाणी आणि मल्टिप्लेक्समध्येही दाखवला जातोय हे समजल्यावर लवकरात लवकर पाहून घ्यावा म्हणून लगेच तिकीट बुक केले. मी स्वतः खूप काळानंतर मराठी चित्रपट पाहिलाय.

हे चित्रपटाचे परीक्षण नाही आणि या चित्रपटाचे कथानकही मी इथे सांगणार नाही.

संपूर्ण भारतात सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ करणाऱ्या एका महानायकाची जीवनकथा, प्रसंग आणि या महानायकाच्या जीवनात आलेल्या आणि स्वतःही वलयांकित असलेल्या अनेक व्यक्तींना चित्रपटाच्या तीन तासांच्या मर्यादित अवधीत पुरेसा न्याय मिळणे शक्यच नसते.

हे माहित असल्याने या चित्रपटात नेमके कायकाय आणि कुणाकुणाला दाखवले गेलेय याबाबतही उत्सुकता होती.

याचे कारण पंचवीस वर्षांपूर्वी मी `महाराष्ट्र चरित्रकोश' लिहिला, इसवी सन १८०० ते २००० या दोन शतकांच्या काळातील सर्वच क्षेत्रांतील बहुतांश प्रमुख व्यक्तींची थोडक्यात एकदोन परिच्छेदांत या चरित्रकोशात ओळख करुन देण्यात आली आहे.

या चरित्रकोशांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील या दीर्घ कालखंडांतील इतिहासाची आणि व्यक्तींची थोडक्यात मला ओळखही झाली आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना एका अर्थाने स्वतःच नायक असलेल्या अनेक व्यक्ती इथे कमीअधिक महत्वाच्या भूमिका पार पडताना पाहिले तेव्हा ' अरेच्चा, आपण यांना ओळखतो की !'' अशी भावना मनात चमकून गेली.

मी फारसे चित्रपट पाहत नाही, त्यात मराठी चित्रपट तर फारच कमी. यापूर्वीचे बायोपिकसुद्धा मी पाहिलेले नाही. बायोपिक म्हटले कि सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जातेच तरीही सत्याशी फार मोठ्या प्रमाणात फारकत घेतली जाऊ नये अशी एक रास्त अपेक्षा असते.

त्यामुळे `सत्यशोधक' चित्रपट सुरु झाल्याझाल्या नामनिर्देशकाची यादी जोरात पळत असली तरी हा चित्रपट कुठल्या चरित्रसाधनांवर किंवा कुणा संशोधकांच्या चरित्रांवर, साहित्यांवर आधारित आहे याची उत्सुकता होती. पण `विविध लेखक' असा उल्लेख नजरेत पडला आणि माझी उत्सुकता निरुत्तरित राहिली.

सांगायला हरकत नाही. हा चित्रपट पाहण्यामागे आणखी एक सर्वांत महत्त्वाचे कारण होते.

Satyashodhak Movie Review: बायोपिक म्हटले कि सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जातेच तरीही... कसा आहे 'सत्यशोधक'?
Israel-Hamas War: भारतातील मुलं जल्लोष करतायत अन् तिकडे गाझामध्ये.... इस्राइल-हमास युद्धाबाबत काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

महात्मा जोतिबा फुले यांना स्त्रीशिक्षणाबाबत प्रेरित करणाऱ्या अहमदनगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या मिस सिंथिया फरार यांचे चरित्र मी अलीकडेच लिहिले आहे. यानिमित्ताने झालेले वाचन मला जोतिबा आणि सावित्रीबाई यांना पुण्यात शिकवणाऱ्या स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मिसेस मार्गारेट शॉ मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्याकडे घेऊन गेले.

साहजिकच स्त्रीशिक्षणातील फुले दाम्पत्याचे पूर्वसुरी असलेले मुंबईतील डॉ. जॉन आणि मार्गारेट विल्सन यांच्याही पहिल्यांदाच ओळखी झाल्या. या सर्वांची अल्पचरित्रेही मी लिहून हातावेगळी केली आहेत.

या व्यक्ती ऐतिहासिक असल्या तरीही फुले दाम्पत्यांच्या बहुतेक चरित्रांत झळकत नाहीत. या पार्श्वभूमीवर `सत्यशोधक' चित्रपटाविषयी मला जाम औत्सुक्य होते.

चित्रपट पाहिला. चित्रपटाने मला निराश केले नाही. बायोपिकच्या अनेक मर्यादा असल्या तरी हा चित्रपट खूप आवडला.

चित्रपटाची सुरुवातच मुळी `मिशनरी स्कुल, पुणे' या कमानीचे दर्शन देऊन होते. सुरुवातीच्या काही प्रसंगात `जेम्स साहेब' यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उल्लेख होतो, हे `जेम्स साहेब' म्हणजेच स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल स्वतःही नंतर पडद्यावर विविध प्रसंगांत झळकतात.

Satyashodhak Movie Review: बायोपिक म्हटले कि सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जातेच तरीही... कसा आहे 'सत्यशोधक'?
सुपरस्टारपलीकडचा संवेदनशील माणूस! 'KGF' स्टार यशने निधन झालेल्या चाहत्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

सदाशिव गोवंडे, फातिमा शेख , उस्मान भाई , डॉ विश्राम घोले, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे अशा अनेक `परिचित' व्यक्ती चालताबोलताना दिसल्या याचा आनंद वाटलाच.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास संदिप कुलकर्णी यांनी तरुणवयातील आणि अखेरच्या काळातले महात्मा जोतिबा फुले अक्षरशः जिवंत उभे केले आहेत हे सुरुवातीपासून जाणवते.

फार लिहित नाही, इथेच थांबतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.