महेश टिळेकर दिग्दर्शित 'हवाहवाई'मध्ये मल्याळम अभिनेत्रीची इंट्री

महेश टिळेकर दिग्दर्शित "हवाहवाई" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Marathi movies Malayalam actress entry in Hawahawai directed by Mahesh Tillekar
Marathi movies Malayalam actress entry in Hawahawai directed by Mahesh Tillekarsakal
Updated on

पुणे : 'द ग्रेट इंडियन किचन'  या बहुचर्चित मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री निमिषा सजयन आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. महेश टिळेकर दिग्दर्शित "हवाहवाई" या चित्रपटात ती दिसणार असून, हा चित्रपट १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Marathi movies Malayalam actress entry in Hawahawai directed by Mahesh Tillekar
IND VS WI | विंडीज विरूद्ध भारताचे 'विराट' अस्त्र

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनचे विजय शिंदे यांनी "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. "द ग्रेट इंडियन किचन" या चित्रपटातील निमिषा सजयनचा अभिनय आवडल्याने टिळेकर यांनी तिला मराठीत काम करण्याविषयी विचारणा केली. त्याला निमिषाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

अक्षयकुमार, जयाप्रदा, हेलन या हिंदी कलाकारांनी टिळेकर यांच्या आधीच्या चित्रपटांमधून मराठीत पदार्पण केलं होतं. त्याशिवाय "बाहुबली" या चित्रपटाचे कॅमेरामन सेन्थील कुमार यांना पहिली संधी टिळेकर यांनी त्यांच्या "आधार" चित्रपटाद्वारे दिली होती.

"द ग्रेट इंडियन किचन" या चित्रपटासह निमिषाच्या नायट्टू, मालिक या चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झालं आहे. वेगळे विषय आणि कलाकारांच्या सहज अभिनयामुळे मल्याळम चित्रपटांचा देशात आणि परदेशातही प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. निमिषाचा बहुचर्चित 'द ग्रेट इंडियन किचन" हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनीही आवर्जून पाहिलेला आहे. "हवाहवाई" या चित्रपटातील भूमिका साजेशी असल्यानं निमिषाला मराठीत पहिला ब्रेक देण्याचं ठरवलं, असं महेश टिळेकर यांनी सांगितलं.

Marathi movies Malayalam actress entry in Hawahawai directed by Mahesh Tillekar
अमित शहांचे आता 'मिशन जाट'! UP निवडणुकीसंदर्भात ठरणार रणनीती

मराठीत नवा ट्रेण्ड

साऊथचे चित्रपट इतर भाषेत भाषांतरीत होऊन प्रदर्शित होत असताना, साऊथमधील उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेण्ड महेश टिळेकर यांनी हवाहवाई सिनेमातून सुरू केला आहे. निमिष सजयनसह मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका असून अनेक नवीन कलाकारांनाही यात संधी दिली आहे.

आशा भोसले यांच गायन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ८८ व्या वर्षी "हवाहवाई" चित्रपटातील एक गाणं गायलं आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आता निमिषा सजयनसारखी सशक्त अभिनेत्री या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत असल्यानं या चित्रपटाविषयीचं कुतुहल आणखी वाढलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.