Marathi Natyasammelan 2024 : 'आम्हाला माहितीये, आम्ही जे काही करतो त्यातून दिवसभराचा खर्चही भरुन निघत नाही. वासुदेवकी करुन कुटूंब चालवणं हे काही आजच्या जमान्यात शक्य नाही. आमचा वेष पाहून लोकं नाही नाही ते बोलतात, कुणी थट्टा करतं तर कुणी आता हे बस्स करा, काही पोटापाण्याचं बघा असेही सांगतात. पण कुणाला आमचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाहीये...'
चिंचवडच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाची साऱ्या राज्यभर जोरदार चर्चा झाली. त्यातील विविध चर्चासत्रं, मुलाखती यामुळे हे नाट्यसंमेलन अनेकांच्या प्रतिक्रियेचा विषय राहिलं, त्यातून अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरुपात पार पडलेल्या या संमेलनाचं मराठी मनानं अन् जनानं प्रचंड कौतुक केलं.
अशातच नाट्यसंमेलनामध्ये उत्साहानं सहभागी झालेल्या वासुदेवांचंही मोठ्या आदरानं स्वागत करण्यात आलं. सकाळच्या वतीनं त्यांच्याशी खास संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी त्यांच्या संघर्षाविषयी आणि नव्या आव्हानाविषयी जे काही सांगितलं ते चक्रावून टाकणारं आहे. वासुदेवकी करुन होणारी ती कमाई किती, त्यातून किती पैसे पदरी येतात आणि त्यातून कुटूंबाचे पालनपोषण तरी कसे होणार, यासारखे प्रश्न उपस्थित करुन त्यांनी लोककला, लोकपरंपरा याविषयी व्यक्त केलेलं मत विचारात पाडणारं आहे.
वासुदेव परंपरा ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमधील महत्त्वाची लोकपरंपरा आहे. त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे लिहिले गेले आहे. कित्येक लेखकांनी त्यांच्या कलाकृतीतून या कलेविषयी सांगितल आहे. आता त्याबद्दल खुद्द ती कला साकारणाऱ्या आणि ती परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून पुढे नेणाऱ्या त्या व्यक्तींनी सद्यस्थिती आणि लोककला याविषयी परखडपणे मत मांडले आहे.
ही संपूर्ण मुलाखत नमूद केलेल्या लिंकमध्ये आपल्याला बघता आणि ऐकता येईल. त्यातून लोककला, लोकपरंपरा यावर वासुदेवकी करणाऱ्यांनी जे मत व्यक्त केले आहे त्यावरुन पुन्हा काही नवे प्रश्न उपस्थित झाले आहे. सुजाण नागरिक म्हणवून घेणाऱ्यांना ते प्रश्न नक्कीच अस्वस्थ करतील यात शंका नाही.
शासनानं आम्हाला अनुदान द्यावं, हा प्रश्न गेली कित्येक वर्ष तसाच आहे, कित्येकदा निवेदनं देऊनही आम्हाला कोणत्याही प्रकारे उत्तर आलेलं नाही. आजची तरुणाई वासुदेव आणि ती परंपरा काय आहे हे विसरत चालली आहे. त्यामुळे पैसे नव्हे तर संस्कृतीसाठी लढावं लागणार आहे. असेही चित्र आहे. आर्थिक आणि सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न समोर असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.