आज आपण अशा एका गाण्याविषयी बोलू जे धुंद नशा आणेल,त्यासाठी मद्य रिचवण्याची गरज नाही या शब्दांची आणि आवाजाचीच नशा बघा किती अद्भूत आहे ती...
एका गझलेवर चिंतन आहे. मद्याची दुकाने आणि त्यावरील चर्चा अलीकडच्या काळात झडल्यात,मात्र आमच्या शायरांनी कितीतरी वर्षांपूर्वीच या मद्यावर अजरामर काव्य रचले आहे. सिने जगतातही आमचे बिग बी नशा शराब में होता तो नाचती बोतल असा तर्क मांडताना आपण बघितले,अमर प्रेम मध्ये आमचे सुपरस्टार राजेश खन्ना, ये क्या हुआ?कैसे हुवा?अशी प्रश्नांची सरबत्ती करून छोडो, ये ना सोचो असे सांगून मोकळे होतात तर आमचे दिलीप साहब, मुझे दुनियावालो शराबी न समझो मै पीता नहीं हूं पीलाई गयी है असे सांगून झिंग आणतात. पण हे गाणं गैर फिल्मी आहे ते देखील किती मस्त हे बघा.
एक गोष्ट लक्षात घ्या बंद झालेली दारूची विक्री अलीकडे सुरू होणे आणि या गाण्याचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही.
मद्यावर आजतागायत जे जे काव्य रचले गेले आहे ते रंजक आहे.हरीवंशराय यांची मधूशाला असो की दिनकर यांची रश्मीरती.
आणि शायरांनी तर एक से बढकर ओळी रचल्या आहेत
छीन कर हाथो से जाम वो
इस अंदाज से बोली
कमी क्या है इन होठो में
जो तुम शराब पीते हो
तौहीन ना कर शराब को कडवा कह कर,
जिंदगी के तजुरबे शराब से भी कडवे होते है
कहते हे पीनेवाले मर जाते है जवानी में
हमने तो बुजूर्गो को जवान होते देखा मैखानेमे
अशी उत्कट शायरी नेहमीच आवडू लागते.
आज आपण ज्या काव्याबाबत बोलणार आहोत त्याच्या लेखकाबाबत मला फार माहिती नाही पण ते शेख आदम अब्बूवाला असावेत असे वाटते, आपल्यापर्यंत चुकीची माहिती पसरवण्याचा हेतू नाही, आपणास जर ही माहिती मिळाली तर कमेंट्स बॉक्समध्ये वा माझ्या खाली दिलेल्या मेलवर नक्की लिहा,कळवा.
पंकज उधास हे नावाजलेले गझल गायक.त्यांनी अनेक गझल गायनाचे कार्यक्रम केलेत, त्यावेळी चांदी जैसा रंग है तेरा आणि या मद्यांवरील अनेक गझलांवर फर्माईश केली जायची त्यात ही गझल असायची.
ना समझो के हम पी गये पीते पीते, शराब चीज ही ऐसी है,ना छोडी जाये अशी कितीतरी गाणी उधास यांच्या अलबम मध्ये आहेत.
मद्यावर खूप काही काही बोललं जातं त्यातलं आपण चांगलं बोलू या.मद्य उत्तम की वाईट हा वादाचा विषय आहे. त्यात आपल्याला पडायचे नाही पण या मद्यामुळे आपल्या भावनांशी जी गणितं जुळली ती नक्कीच अशी गाणी ऐकली,वाचली की आपोआप सुटतात किंवा ती सुटू शकतात असा आशावाद निर्माण होतो.हे काव्य लिहिणारा शायर आणि गायक यांचा अप्रतिम मिलाप हे गाणं ऐकताना लक्षात येतो.
-शेख आदम अब्बूवाला यांची बेहतरीन शायरी
-सतार आणि गिटारवाद्यांचा मधूर उपयोग
-पंकज उधास हे कलासक्त संगीतप्रेमी
-मद्याची झिंग आणण्याची ताकत असलेलं गाणं
शब्दातील सौंदर्य आणि आवाजातील माधुर्याचा मिलाप
पंकज उधास हे उत्तम गायक. शब्दांवर त्यांचं प्रभुत्व.गझलेतील शब्दात असलेलं सौंदर्य आणि गायकाच्या आवाजातील माधुर्य यांचा मिलाप म्हणजे पंकज उधास यांच्या आवाजाची नजाकत लक्षात येते.या गझलेत जे नेमकं आवर्जून सांगायचं आहे तेच आवाजातून अधोरेखित करण्याचं कसब हे गाणं ऐकतांना समजून येतं.आता बघा ना मद्य घेण्याची तऱ्हा कशी असते हे शायराने स्पष्टपणे सांगितले असले तरी ते उधास ज्या पद्धतीने गातात ते अधिक रुचतं.
प्यायची मजा कशी घ्यायची?या प्रशांची चपखल उत्तर उधास यांच्या या गायनाच्या शैलीतुन मिळतं.
मजा लेना है पीने का तो यानंतर कम कम, धी रे,धीरे पी हे ज्या लकबीने सांगितले तेथेच हे गाणं मनांत घर करतं ते कायमचं.
..आणि या शायराने काय मद्याची महती वर्णन केली आहे?अगदी मस्तच,जो मद्य घेत नाही, त्याला देखील मद्याची चव घेण्याची घेतली पाहीजे असे जाणवेल इतका या शब्दांचा प्रभाव.
नशा कर हलकासा,लहू में हो तहलकासा
मीटेगा होले होले ये तेरा गम..
या ओळी अशाच प्रभावशाली.
या गझलेला सुंदर स्वरात गुंफण्याचं काम देखील या गायकाचेच.सतार आणि गिटार या दोन मधूर वाद्यांचा उपयोग करून घेतांना पंकज उधास यांनी आपण मूळात संगीतप्रेमी आहोत,हे पटवून दिले.अगदी ऐकताना डोलायला लावणारं, तल्लीन होण्यास भाग पाडणारं हे गाणं आपल्या खजिन्यात असलंच पाहिजे दारूची दुकाने कायम बंद झालीत तरी तीच झिंग आणण्याची ताकत या गाण्यात आहे.
जुदा होके दुखी होना, तडपना जागना रोना
जवानी में तो होंगे सेकडो गम
असं जीवनाचं वास्तव सांगणारं हे काव्य पंकज उधास यांच्या आवाजाने अजरामर झालं एवढं नक्की.
tandalikar.atul@rediffmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.