जागतिक स्तरावर रंगभूमी दिन 27 मार्च या दिवशी करण्यात येतो. तर महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. 1843 मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला.
चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली.
मराठी रंगभूमी ही अनेक दमदार नाटकांनी गाजलेली आहे. तर काही नाटकांना तर प्रेक्षकांनी तर अक्षरश: डोक्यावरच घेतलं. अशीच काही गाजलेली नाटकं जी तुम्ही नक्कीच पहिली असतील नसेल तर एकदा पहाच...
घाशीराम कोतवाल:
घाशीराम कोतवाल हे पाहिलं मराठी नाटक आहे जे जागतिक रंगभूमीवर गेलं. या नाटकावरून महाराष्ट्रात वादही पेटले. पण या नाटकाने इतिहास घडवला.
सखाराम बाईंडर:
तेंडूलकरांच्या कलाकृतींमध्ये जे वेगळेपण आहे ते सखाराम बाईंडर मधून ठळकपणे समोर आले. सर्वसामान्यांची कथा सांगताना मानवी स्वभावाचे अनेक बाबी उलगडून सांगतात. ‘सखाराम बाईंडर’ रंगभूमीला एक वेगळं वळण दिलं.
नटसम्राट
नटसम्राट हे मराठी चित्रपटाच्या इतिहासातील प्रदीर्घ काळातील सर्वोत्कृष्ट नाटक मानले जाते. मराठी इंडस्ट्रीवर 50 वर्षांहून अधिक काळ राज्य केले आहे. नटसम्राटला त्यांच्या उत्कृष्ट कथेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
वाऱ्यावरची वरात:
पु. ल. देशपांडे यांनी एकेकाळी गाजवलेलं हे नाटक प्रचंड लोकप्रिय झालं. पुलंच्या नंतर त्यांची भूमिका अनेकांनी वठवली.
जाणता राजा:
बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं ‘जाणता राजा’ हे नाटक मराठी माणसासाठी खास ठरलं. या नाटकामुळे शिवाजी महाराजांचं चरित्र भव्य स्वरुपात सामान्य माणसापर्यंत पोहोचलं.
मी नथुराम गोडसे बोलतोय :
मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक देशभरात प्रचंड लोकप्रिय असले तरी, महात्मा गांधींच्या हत्येमागील तर्क स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे या नाटकावर दीर्घकाळ बंदी घालण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.