Jui Gadkari: एखादा सिनेमा किंवा एखादी मालिका पाहताना सगळं चकाचक आपल्याला दिसतं..त्यातील अनेक सीन्सचं आपण कौतूक करतो ...पण हे सगळं आपल्यापर्यंत इतक्या सुदंरपणे पोहचवण्यामागे अनेकांचे कष्ट दडलेले असतात. कितीतरी सीन शूट करताना अनेकांचे कस लागतात. असाच एक किस्सा अभिनेत्री जुई गडकरीनं शेअर केला आहे.
तिनं फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर करत गाडीत दोन कलाकारांवर एखादा सीन शूट होतो तो नेमका कसा होतो ,याविषयी सविस्तर सांगितले आहे. जुई सध्या 'ठरलं तर मग' या स्टार प्रवाह वरील मालिकेत काम करत आहे. जुईनं अनेक वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.( Marathi Serial: Jui Gadkari marathi actress post video of shoot, how to shoot scene inside car)
जुईनं या गाडीतल्या सीनचा किस्सा शेअर करताना लिहिलं आहे की,
''जेव्हा कार मधले सिन्स शुट होतात तेव्हा आम्हा दोघांव्यतिरीक्त एक तिसरा माणुस गाडीत लपलेला असतो!!! अतिशय अवघडलेल्या जागेत झोपुन (स्वतःला लपवुन) तो एका वेळी बेर्याच गोष्टी करत असतो!! Script follow करणे Sound roll करणे (sound recordist), techincal बाबी सांभाळणे, take करणे ई. त्या जागेत (देन सीट मधली जागा) cables, battery, sound equipment, mounted lights अशा अनेक गोष्टी असतात पण तरीही पुर्ण टेक होई पर्यंत तिथे झोपुन तो तिथुन सगळं काम करत असतो!!
आमच्या बरोबर असलेला हा छुपा रुस्तम म्हणजे आमचा Associate Director स्वप्नील काळे!!''
Hats off to the team work and efforts that everyone puts in!
'ठरलं तर मग' या मालिकेत जुई गडकरीसोबत अभिनेता अमित भानुशाली देखील मध्यवर्ती भूमिकेत दिसत आहेत. जुई आणि अमित हे दोघेही काही वर्षांपूर्वीचे मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे. मधल्या काळात दोघंही अभिनय क्षेत्रापासून लांब होते.
पण आता पुन्हा मुख्य भूमिकेत दोघांनी दमदार कमबॅक केलं आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेत अमित हा अतिशय तिखट स्वभावाचा बिझनसमॅन दाखवलाय तर जुई त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी एक साधी पण तत्वनिष्ठ मुलगी दाखवलीय.
मालिका आता हळूहळू लोकांना आवडू लागलीय. सध्या मालिकेतील अमित आणि जुई यांच्यातील सीन्सना अधिक पसंती मिळताना दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.