Marathi Serial: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका बरेच दिवस नंबर वन वर होती पण आता अचानक मालिकेचा टीआरी घसरायला लागला अन् लगेच मालिकावाल्यांना जाग आली....असं आम्ही नाही म्हणत आहोत बरं का..हे म्हणत आहेत मायबाप प्रेक्षक. ज्यांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं होतं आणि आता तेच या मालिकेला वैतागले आहेत. कारण गेले अनेक महिने मालिका कार्तिक आणि दीपा यांच्यातील गैरसमजावरच ओढली जात आहे.
आता कार्तिक-दीपामधील गैरसमज आणि त्यांच्यातील दुराव्याचा लोकांना कंटाळा आला आहे. आणि याचा परिणाम म्हणजे मालिकेच्या टीआरपी मध्ये कमालीची घसरण झालेली दिसून आली. (Rang Maza Vegla Serial,kartik know the truth,new promo, Netizens troll)
आता एक नवा प्रोमो मालिकेचा समोर येत आहे, ज्यात कार्तिकसमोर गेल्या अनेक दिवसांपासून लपलेलं सत्य समोर येताना दिसत आहे. प्रोमो पाहिल्यावर मालिकेचा चाहता वर्ग मात्र भलताच खुशीत आहे पण काही नेटकऱ्यांनी मात्र मालिकावाल्यांची खिल्ली उडवलेली आहे. इतक्या उशीरानं निर्मात्या-दिग्दर्शकांना शहाणपण सुचलं का असा सवाल करत नेटकरी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
हेही वाचा- संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
प्रोमोमध्ये दिसत आहे की कार्तिकला आता कळणार आहे ते त्याच्या फर्टीलिटी टेस्टच्या रीपोर्टमध्ये घोळ झाला होता. रिपोर्ट बदलल्यानं कार्तिकसमोर आलं होतं की तो कधीच बाबा बनू शकत नाही. पण ते सत्य नसून तो बाबा बनू शकतो हे सत्य त्याला आता अनेक वर्षांनी कळणार आहे. आणि दीपानं जन्म दिलेल्या दोन जुळ्या मुलींचा तोच बाबा आहे हे देखील त्याला समजणार आहे.
मालिकेच्या नवीन प्रोमोवर टीका करताना लोक म्हणताना दिसत आहेत की,'सत्य सांगितलं पण इतक्या उशीरा. अजून काही वर्ष थांबले असतात तरी चाललं असतं'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'जेव्हा मालिकेचा टीआरपी खाली गेला तेव्हा यांना शहाणपण सुचलं'. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'आता अक्कल आली का? प्रेक्षकांना किती दिवस ताटकळत ठेवणार होतात'.
पण एवढं मोठं सत्य समोर आणून हे कोणी केलंय त्या श्वेताचं नाव मात्र समोर आलेलं नाहीच. म्हणजे अजून घिसापिटा ड्रामा पहायला मिळणार हे नक्की. आणि त्सासाठी आणखी किती वर्ष प्रेक्षकांना वेठीस धरणार देव जाणे. अशा प्रतिक्रिया देखील देत काही नेटकऱ्यांनी मालिकेवर टीका केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.