Marathi Serial TRP: थोडक्यात मागे पडली आई.. अन् भाव खाऊन गेली गडकरींची जुई..
Marathi Serial TRP update: मालिका ह्या रटाळ असतात. असंही कुणीही कितीही बोललं तरी मालिकांची काही कमी झालेली नाही. आजही चांद्या पासून बांद्यापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात. सध्या मराठीमध्ये पाच वाहिन्या आणि पंचवीस हून अधिक मालिका असल्याने कोणती मालिका 'टीआरपी'च्या रेस मध्ये सर्वात वर आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
गेली काही महीने 'स्टार प्रवाह' वाहिनी यामध्ये सर्वात पुढे आहे. या वाहिनीवरील आशय हा सर्वाधिक पाहिला जाणारा असून प्रेक्षकांची त्याला मोठी पसंती आहे. सध्या या वाहिनीच्या सगळ्याच मालिका रेकॉर्ड ब्रेक आकडे गाठत असून यंदाही याच वहिनीचा 'टीआरपी'वर दबदबा राहिला आहे.
(marathi serial trp rating latest update jui gadkari tharla tar mag serial first rank in trp race aai kuthe kay karte got second position)
सुरवातीला टीआरपीच्या शर्यतीत याच वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' आणि 'आई कुठे काय करते' या मालिकांचा दबदबा राहिला पण आता हा ओघ ओसरताना दिसत आहे. कारण गेली काही आठवडे सलग सर्वाधिक टीआरपी मिळवून प्रथम स्थानी राहण्याचा मान अभिनेत्री जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग' मालिकेने मिळवला आहे आणि यंदाही तो कायम आहे.
या आठवड्यात 'टीआरपी'च्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली प्रमुख भूमिकेत असून एक वेगळीच लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
तर यंदाही आईची पीछेहाट झाली असून 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. सध्या मालिकेत 'इशा'च्या साखरपुड्याची लगबग सुरू असून अनिरुद्धची बिजनेस पार्टनर 'वीणा'ची एंट्री झाली आहे. ती आशुतोषची बहीण असल्याने मालिकेत वेगळीच रंगत येणार आहे.
तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका काहीशी पुढे आली असून तिने तिसरे स्थान पटकावले आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे एक काळ सातत्याने पहिल्या स्थानावर असणारी रंग माझा वेगळा ही मालिका चौथ्या स्थानावर आली असून तिला 6.3 रेटिंग मिळाले आहे.
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेला 6. 1 रेटिंग मिळाले असून ती पाचव्या स्थानावर तर 'ठिपक्यांची रांगोळी' ही ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे. तर 'सहकुटुंब सहपरिवार', 'स्वाभिमान', 'अबोली' , 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा' हे कार्यक्रम अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.