Chirbhog: नॅशनल ह्यूमन राइट्सच्या ८ व्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत मराठी लघुपटाने पटकावले पारितोषिक

Chirbhog
ChirbhogEsakal
Updated on

नॅशनल ह्यूमन राइट्सच्या (NHRC ) ८ व्या शॉर्ट फिल्म स्पर्धात नाशिकचे दिग्दर्शक निलेश आंबेडकर यांच्या "चिरभोग" या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळाला आहे. देशभरातून अनेक लघुपटांसोबत स्पर्धा करत चिरभोग ने हे पारितोषिक पटकावले आहे.

Chirbhog
Alia Bhatt Video: आपल्या पापाराझींनी टॉमला 'टोम्या' म्हटलं अन् तिकडच्यांनी अलियाला...

नॅशनल ह्यूमन राइट्सच्या वतीने 2 लाखांच्या प्रथम पारितोषिकासाठी मराठी लघुपट 'चिरभोग'ने बाजी मारली तर आसामीमधील सक्षम ( Enabled ) आणि तमिळमधील 'अचम थानवीर' (Atcham Thanvir) यांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेत सक्षम ला 1.5 लाखांचे आणि 'अचम थानवीर रु. १ लाखांचे पारितोषिक मिळाले.

Chirbhog
TDM Screenings: 'माफ करा 'TDM' प्रदर्शन थांबवतोय!' दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेचा निर्णय

चिरभोग या लिघुपटात समाजातील अनिष्ट रुढी प्रथांवर भाष्य करण्यात आले आहे.

अनिष्ट रुढी प्रथांमुळे एका विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेल्या संघर्षाची गोष्ट हा लघुपट सांगतो.

यात राजविर परदेशी, सुकेशीनी कांबळे, सुशीलकुमार शिर्के, सोपान भोईर, राहुल बनसोडे, सचिन धारणकर व राहुल सोनवणे यांनी प्रमुख भूमिका साकरल्या आहे.

Chirbhog
PS 2 Box Office: 'पोन्नियिन सेल्वन 2' चं बॉक्स ऑफिसवरच युद्ध सुरुच! कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला..

चिरभोग या लिघुपटाचे चित्रीकरण विनायक जंगम व रोहित गायकवाड यांनी केले असून संकलन मयूर सातपुते व संगीत शशिकांत कांबळी यांनी केले आहे, वेशभूषा श्वेता सवाई यांनी तर उपशीर्षक श्रद्धा जगदाळे व मेकअप संदीप रायकर यांनी केले आहे.

पार्श्वगीत ज्ञानेश्वरी जमदाडे या बाल गायिकेने गायले आहे. तसेच या कलाकृतीसाठी दिलीप आहेर, सचिन धारणकर, सोपान भोईर, संघमित्रा सोनवणे यांचे सहकार्य यासाठी लाभले होते. उमरेड चित्रपट महोत्सवात देखील चिरभोग सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणुन निवड झालेली आहे.

नॅशनल ह्यूमन राइट्सचे अध्यक्ष श्री. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील सदस्य डॉ. ज्ञानेश्वर एम. मुळे आणि राजीव जैन यांनी पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निवड केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()