Marlene Ahuja: गदर 2 च्या आनंदात देओल कुटुंबावर दुःखाचे सावट, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन

गदर 2 चं यश साजरं करत असतानाचा सनी देओलच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालंय
Marlene Ahuja passed away bobby deol mother in law gadar 2 sunny deol
Marlene Ahuja passed away bobby deol mother in law gadar 2 sunny deol SAKAL
Updated on

बॉलिवूडमध्ये देओल कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई केली आहे. नुकतीच गदर 2 ची सक्सेस पार्टी झाली. या पार्टीला सर्व तारेतारका उपस्थित होते. देओल कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बॉबी देओलची सासू मर्लिन अहूजा यांच्या निधनाची बातमी समोर आलीय. त्यामुळे आनंदाच्या वातावरणात देओल कुटुंबावर दुःखाचं सावट आलंय.

(Marlene Ahuja passed away bobby deol mother in law)

Marlene Ahuja passed away bobby deol mother in law gadar 2 sunny deol
Urmila Nimbalkar: "तडकाफडकी मालिकेतुन काढलं अन् ..", उर्मिला निंबाळकरने सांगितला डिप्रेशनचा भयावह अनुभव

देओल कुटुंबातील दुःखाचा डोंगर कोसळला

Indiatoday च्या रिपोर्टनुसार, बॉबी देओलची सासू मर्लिन आहुजा यांचे निधन झाले आहे. बॉबी देओलची पत्नी तान्या आहुजा आईच्या निधनाने शोकसागरात बुडाली आहे.

रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, तान्याची आई मर्लिन बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. अखेर मर्लिन आहुजांची रविवारी म्हणजेच २ सप्टेंबर रोजी जीवनाशी झुंज अपयशी ठरली. प्रदीर्घ आजाराने त्यांचं निधन झाल्याचं बोललं जात आहे.

मर्लिन एक यशस्वी व्यावसायिक महिला

मर्लिन या शेवटपर्यंत मुंबईत राहत होत्या. मर्लिन यांची मुलगी आणि बॉबी देओलची बायको तान्या आहुजा ही करोडपती बँकर दिवंगत देवेंद्र आहुजा यांची मुलगी आहे. मर्लिन आहुजा या देखील एक व्यावसायिक महिला होत्या.

मर्लिन यांच्या पश्चात मुलगी तान्या आहुजा आहेच याशिवाय त्यांना विक्रम आहुजा आणि मुनिषा आहुजा ही दोन मुलंही आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()