लग्नाची गोष्ट : गोडी गुलाबीचं घट्ट नातं!

मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीची गायिका म्हणजे जान्हवी प्रभू-अरोरा. तिनं गायलेली अनेक मालिकांची शीर्षकगीतं, वेगवेगळ्या शैलींची चित्रपटगीतं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
Janhavi Arora and Samir Arora
Janhavi Arora and Samir AroraSakal
Updated on
Summary

मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीची गायिका म्हणजे जान्हवी प्रभू-अरोरा. तिनं गायलेली अनेक मालिकांची शीर्षकगीतं, वेगवेगळ्या शैलींची चित्रपटगीतं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

- जान्हवी प्रभू अरोरा, समीर अरोरा

मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीची गायिका म्हणजे जान्हवी प्रभू-अरोरा. तिनं गायलेली अनेक मालिकांची शीर्षकगीतं, वेगवेगळ्या शैलींची चित्रपटगीतं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. तिच्या पतीचं नाव आहे समीर अरोरा. ते निर्माते-लेखक आहेत. एका हिंदी चॅनेलसाठी समीर एक शो प्रोड्यूस करत असताना जान्हवी त्या शोचे शीर्षकगीत गाण्यासाठी ऑडिशनला आली होती. तेव्हा समीरनं तिला पहिल्यांदा पाहिलं आणि तेव्हाच समीर तिच्या प्रेमात पडले. पुढं त्यांच्यात छान मैत्री झाली आणि ते १९९९मध्ये विवाहबद्ध झाले.

समीर म्हणाले, ‘‘जान्हवी ही जितकी चांगली बायको आहे, तितकीच चांगली आई आहे, मुलगी आहे, सून आहे. तिला प्रत्येक नात्याची उत्तम जाण आहे. सगळ्यांमध्ये ती मिळूनमिसळून राहते, तिच्या स्वभावानं ती सगळ्यांना बांधून ठेवते. मुख्य म्हणजे, तिला सगळी नाती उत्कृष्टप्रकारे जपता येतात. तिच्या माहेरचे किंवा सासरचे नातेवाईक असो, मित्रपरिवार असो; प्रत्येकाच्या मनात जान्हवीने घर केलं आहे. सगळ्यांशी बॉण्डिंग असूनही ती प्रत्येकाला त्याची स्पेस देते.

तिचं म्हणणं ती ठामपणे मांडू शकते, कधीही ती चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही. कोणाला काय आवडतं, काय आवडत नाही, किंवा आई बाबांना कोणत्या वेळी कोणती औषध द्यायची हे तिला बरोबर माहीत असतं. ती सगळेच पदार्थ उत्कृष्ट बनवते. संगीत क्षेत्रात काम करत असल्यानं कामाच्या वेळा कधीही निश्चित नसतात. पण तरीही घर आणि काम याचा ती छान समतोल साधते. आमच्या मुलांसाठी ती आदर्श आई आहे. त्यांचा अभ्यास, त्यांचं जेवण-खाण, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद याकडं तिचं कायम लक्ष असतं. हे सगळं करून ती स्वतःच्या कामातही तिचं बेस्ट देते. तिनं वेगवेगळी गाणी गायली आहेत. पण ‘उंच माझा झोका’ या मालिकेचं शीर्षकगीत, तसंच मितवा चित्रपटातील ‘सावर रे’ ही तिने गायलेली गाणी मला विशेष आवडतात. आमच्या आवडीनिवडी खूप सारख्या आहेत. आम्हा दोघांनाही गाणी ऐकायला आवडतात, ‘फ्रेंड्स’ ही वेब सिरीज, ‘टायटॅनिक’ हा चित्रपट आमचा फेव्हरेट आहे, आम्ही दोघंही खवय्ये आहोत. ती खरंच खूप चांगली जोडीदार आहे.’’

समीरबद्दल जान्हवी म्हणाली, ‘‘ज्या घरात नवरा आणि बायको दोघंही कमावते असतात, त्या घरात त्यांच्या कामात नवऱ्याला बायकोचा आणि बायकोला नवऱ्याचा सपोर्ट हवाच असतो. तसाच समीरचा मला पहिल्या दिवसापासून पूर्ण पाठिंबा मिळत आला आहे. फक्त समीरच नाही, तर माझे सासू-सासरेही माझ्या कामात मला प्रोत्साहन देत आले आहेत. हे सगळं असल्यामुळं मी निर्धास्तपणे काम करू शकते, गाण्याच्या कार्यक्रमांना बाहेर गावी जाऊ शकते.

यावरूनच कळून येतं की समीर हा किती समजूतदार आहे. आम्ही एकमेकांना आपापली स्पेस देत असलो, तरी सगळ्या गोष्टी आम्ही अजूनही एकमेकांना विचारून करतो. पण इतकी वर्ष एकमेकांसोबत राहात असल्यामुळं एखाद्या गोष्टीबद्दल समीरचं मत काय असंल, हे मला माहीत असतं. त्यामुळं तो कसा रिअॅक्ट करेल याची मला अजिबात काळजी नसते. त्याचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. मी एखादी गोष्ट करत असेन, तर त्यामागं माझा हेतू चांगलाच असणार आणि मी जे करेन ते आपल्या घरच्यांच्या चांगल्यासाठीच करणार, याची त्याला नेहमी खात्री असते. तो प्रत्येकवेळी अत्यंत जबाबदारीनं वागतो. वडील म्हणून तर तो द बेस्ट आहे. आमच्या मुलांच्या बाबतीत तो हळवा आहे. त्याचं मुलांशी कमालीचं बॉण्डिंग आहे. अशा काही गोड गोष्टींमुळं आमच्यातलं हे नातं आजही तितकंच घट्ट टिकून आहे."

(शब्दांकन - राजसी वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.