लहानपणी बाथरुममध्ये दिवे विझवून का वावरायची मसाबा गुप्ता?

मसाबा ही बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे.
Masaba Gupta(fashion Designer)-Daughter of Bollywood actress Neena Gupta.
Masaba Gupta(fashion Designer)-Daughter of Bollywood actress Neena Gupta.Google
Updated on

फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता(Masaba Gupta)नं तिच्या शाळेतला एक किस्सा नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. तिनं एकदा शाळेत जाताना गोरं दिसण्यासाठी आपली आई नीना गुप्ता यांचा मेकअप चेहऱ्यावर लावला होता याविषयीचा तो किस्सा आहे. मसाबा ही बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta) आणि वेस्ट इंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. त्यामुळे अर्थातच तिचा लूक हा थोडा भारतीय आणि थोडा वेस्ट इंडिज यांचं परफेक्ट मिश्रण आहे. पण तिच्या या लूकवरनं लहानपणी शाळेत असताना अनेकांच्या विचित्र नजरांचा आणि बोलण्याचा त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळे आपल्या मनात दिसण्यावरनं कसा न्यूनगंड निर्माण झाला होता यावरही तिनं नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

तिनं एकदा शाळेत जाताना आईच्या मेकअप कीटमधील फाऊंडेशन आपल्या चेहऱ्यावर लावलं होतं. फक्त त्यावेळी तिला गोरं दिसायचं होतं इतकंच माहित होतं. पण ते आपल्या चेहऱ्यावर कसं दिसेल,सूट होईल का याची त्यावेळी तिला कल्पना नव्हती. ''लहानपणी मुलं आपल्याला वेगळं दिसण्यावरनं जेव्हा चिडवायची तेव्हा माझाच मला राग यायचा. मला स्वतःला मी आवडेनाशी झाले होते. मला माझी ओळख बदलायची होती. मला वाटत होतं मी माझं रुप बदलून टाकावं,कारण मी जशी दिसते त्याचा मला किळस वाटायचा. मला सारखं वाटायचं,माझे केस असे का आहेत,माझे ओठ विचित्र का दिसतात,मला असं शरीर का मिळालंय,मी इतरांसारखी का दिसत नाही. मला नेहमी समोरच्यासारखं दिसायला हवं असायचं. इतर त्यांच्या वागणुकीतून माझा छळ करत होतेच,पण त्यापेक्षा अधिक मी स्वतः माझी प्रतारणा करत होते''.

Masaba Gupta(fashion Designer)-Daughter of Bollywood actress Neena Gupta.
हृतिकची गर्लफ्रेंड सबानं लांबसडक केस केले दान;सुझैन खाननेही केलं कौतूक

मेकअप च्या किस्स्याविषयी सांगताना मसाबा म्हणाली,''मी आठवीत होते, तेव्हा एकदा मी मेकअप करून शाळेत गेले होते. आईचं फाऊंडेशन मी माझ्या चेहऱ्यावर लावलं होतं. जे माझ्या स्कीनला सूट नाही झालं आणि माझा चेहरा वेगळाच विचित्र पांढरा दिसू लागला. आता हे मला कळलं नाही कारण मी नेहमी माझ्या बाथरुममध्ये लाइट न लावता वावरायचे कारण माझा चेहरा मला आरशात पहायला आवडायचा नाही. त्या अंधारात चाचपडत तो मेकअप केल्यानं मला तो कसा दिसतोय हे कळलं नव्हतं. पण पुढे शाळेत गेल्यावर माझं जे हसं झालं त्यानं मी अस्वस्थ झाले होते''. मसाबा गुप्ता लवकरच 'मसाबा मसाबा' च्या दुसऱ्या सीझनमधनं आपल्या भेटीस येत आहे. पहिला भाग हा नेटफ्लिक्सवर ऑगस्ट २०२० मध्ये रिलीज झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.