Meena Kumari Biopic : 'बॉलीवूड सगळ्यात चोरटं'! मीना कुमारीचे चिरंजीव संतापले

मीना कुमारी यांचा बायोपिक हा कायद्याच्या कचाट्यात सापडणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
Meena Kumari Biopic
Meena Kumari Biopicesakal
Updated on

Meena Kumari step son tajdar amrohi will take legal action : बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात येणार आहे असे कळताच चाहत्यांना कमालीचा आनंद झाला होता. ज्या अभिनेत्रीनं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्या मीनाकुमारी यांचा चाहतावर्ग केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधून एक बातमी समोर आली होती. ती म्हणजे बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा हा आता दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणार आहे. आणि तो मीना कुमारी यांच्यावर आधारित बायोपिकची निर्मिती करणार आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन ही मीना कुमारी यांची भूमिका करणार असल्याची चर्चाही समोर आली आहे. अशातच हा चित्रपट वादाचे कारण ठरतो आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

मीना कुमारी यांचा बायोपिक हा कायद्याच्या कचाट्यात सापडणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. मीना कुमारी यांचा सावत्र मुलगा ताजदार अमरोही यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी बॉलीवूडला चोरटं असं संबोधलं असून जे कुणी मीनाकुमारी यांच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करत आहेत त्यांना आपण कायदेशीर मार्गानं धडा शिकवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ताजदार अमरोही हे कमाल अमरोही यांचे चिरंजीव आहेत.

Meena Kumari Biopic
Malaika Arora : लग्नाची तारीख जवळ आलीय!

मीडियाशी बोलताना ताजदार हे नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी म्हटले की, बॉलीवूडमधील काही लोकं ही दिवाळखोर आणि चोरटी आहेत. त्या लोकांना आमच्या आयुष्यात डोकावण्याचा काही एक अधिकार नाही. त्यांनी आमच्यापासून लांब राहावे. याचे परिणाम चांगले होणार नाही. त्यांनी वेळीच न ऐकल्यास आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे ताजदार यांनी म्हटले आहे.

Meena Kumari Biopic
Akshay Kumar : अक्षय धुतल्या तांदळाचा नाही, बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीला त्यानं...

मेकर्सनं कोणताही परवानगी न घेता मीना कुमारी यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली. हे चूकीचे आहे. त्यांनी आमची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही मेकर्सच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे ताजदार यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()