Merry Christmas Twitter Review: कतरिना कैफचा 'मेरी ख्रिसमस' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. प्रेक्षक खूप दिवसांपासून या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते.
आता अखेर 12 जानेवारी रोजी 'मेरी ख्रिसमस' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
आता या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो संपला आहे. त्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांना 'मेरी ख्रिसमस' खुपच आवडला आहे.
चित्रपटातील कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना खुपच आकर्षित केले आहे. तर अनेकांनी श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे.
श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटाला तरण आदर्शने साडे तीन स्टार दिले आहे. त्यांनी 'मेरी ख्रिसमस' हा 'उत्तम आणि मनोरंजक' चित्रपट असल्याचे सांगितले आहे. 'मेरी ख्रिसमस'मध्ये अनेक रोमांचक दृश्ये आणि उत्कृष्ट ट्विस्ट आणि टर्न असल्याचे ते म्हणाले आहे.
विजय सेतुपतीच्या अप्रतिम अभिनयासोबत कतरिना कैफने देखील बाजी मारली आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झाला असून सर्वांनाच सिनेमा खुपच आवडला आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले की, "मेरी ख्रिसमस पहिल्या भागात संथ आहे मात्र चित्रपट खूपच आनंददायक आहे." दुसऱ्या भागात आमच्यासाठी काय नवीन केले आहे हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत"
तर दुसऱ्याने लिहिले की, "विजय सेतुपती आणि कतरिना कैफ स्टारर हा एक स्मार्ट, मनोरंजक चित्रपट आहे."
एका प्रेक्षकाने लिहिले, "मेरी ख्रिसमसची सुरुवात संथपणे होते परंतु उत्तरार्धात त्याचा वेग वाढतो आणि ट्विस्ट तुम्हाला धक्काच देतो. कतरिना कैफने तिच्या अभिनयाने आश्चर्यचकित केले आणि ती अशी भूमिका करू शकते हे सिद्ध केले. तर विजय सेतुपती हा चित्रपटाचा आत्मा आहे!”
“फिल गुड फर्स्ट हाफसह एक अतिशय आकर्षक रोमँटिक थ्रिलर आणि त्यानंतर एक रोमांचक सेकंड हाफ. चित्रपटात इंटरव्हल, प्री-क्लायमॅक्स आणि ट्विस्ट उत्तम काम केले. असे एकाने लिहिले आहे.
आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकणार नसला तरीही प्रेक्षकांनी चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हटले आहे.
कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस'मध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन, टिनू आनंद, राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू, राजेश विल्यम्स आणि परी यांच्याही भूमिका आहेत.
अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे याही चित्रपटात कॅमिओमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.