Mia Khalifa: पॅलेस्टाईनला सपोर्ट केल्याने मिया खलिफा अडचणीत, तडकाफडकी नोकरीवरुन काढलं

पॅलेस्टाईनला सपोर्ट केल्याने मिया खलिफाला नोकरीवरुन काढून टाकण्याची घटना घडलीय
mia khalifa lost his business job due to support palestine during israel war
mia khalifa lost his business job due to support palestine during israel war SAKAL
Updated on

सध्या पॅलेस्टाईन - इस्राइल युद्धाच्या चर्चा जगभर आहेत. या युद्धाचे संपूर्ण जगावर दूरगामी परिणाम होणार आहेत. सध्या जगभर या युद्धाची चर्चा सुरु आहे.

अशातच अभिनेत्री मिया खलिफाने पॅलेस्टाइन इस्त्राइल युद्धात पॅलेस्टाइनला सपोर्ट केल्यामुळे तिला नोकरीवरुन काढून टाकण्याची गोष्ट घडली आहे.

(mia khalifa lost his business job due to support palestine)

mia khalifa lost his business job due to support palestine during israel war
Amitabh Bachchan : बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

मिया खलिफाने पॅलेस्टाइनला केला सपोर्ट

मिया खलिफाने ट्विट केलं होतं की, "तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थितीकडे बघू शकत असाल आणि पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात. आणि इतिहास हे काळानुसार दाखवेल.' मियाच्या या ट्विटवर काही जण मिया खलिफावर वाईट टीका करत आहेत.

या ट्विटवर रेड लाईट हॉलंडचे सीइओ तोड शापिरो यांनी ट्विट करत मियावर टिका केली. पॅलेस्टाईनने केलेल्या हल्ल्यात इस्त्राइलमध्ये शेकडो माणसं मृत्युमुखी पडली. या गोष्टीकडे बोट दाखवत त्यांनी मियावर टिका केली. (Latest Marathi News)

पॅलेस्टाइनला सपोर्ट केल्याने मियाने नोकरी गमावली

मियाची गेल्या वर्षी रेड लाईट हॉलंड कंपनीत सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मियाने पॅलेस्टाईनला आपला भक्कम पाठिंबा व्यक्त केला आहे. याशिवाय सीईओला उत्तर देताना, तिने लगेच त्याला 'झायोनिस्ट' म्हणून लेबल केले आणि ट्विट केलं की, “मला असे म्हणायचे आहे की, पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्याने माझ्या व्यवसायाच्या मी संधी गमावल्या आहेत."

अशाप्रकारे पॅलेस्टाइनला समर्थन दिल्याने मियाने तिची नोकरी गमावली आहे.

इस्रायलमधील हमासच्या हल्ल्याचे समर्थन केल्याबद्दल मियाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले आहे.

पॅलेस्टाइनने इस्त्राइलमध्ये केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, चालू संघर्षादरम्यान सुमारे 2,000 लोक जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.