२४ ऑगस्ट,१९९३...माइकल जॅक्सनच्या आयुष्यातील 'काळा दिवस', वाचा इनसाइड स्टोरी

माइकल जॅक्सन वर्ल्ड टूरवर असताना २४ ऑगस्ट,१९९३ या दिवशी त्याला एक धक्कादायक बातमी समजली अन् त्याचं आयुष्य हादरुन गेलं होतं.
Michel Jackson History of sexual abuse accusations know the all deets
Michel Jackson History of sexual abuse accusations know the all deets Google
Updated on

Michel Jackson: माइकल जॅक्सनच्या डान्सचे आणि गाण्याचे आजही असंख्य चाहते जगभरात आहेत. भले माइकल जॅक्सन आज आपल्यात नाही पण पॉप म्युझिक आजही लोकांच्या मनावर राज्य करते. माइकल जॅक्सनला 'किंग ऑफ पॉप' देखील म्हटलं जातं. त्यानं पॉप म्युझिकला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. माइकल जॅक्सनच्या नावावर २३ गिनिज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आहे. याव्यतिरिक्त १३ ग्रॅमी अॅवॉर्ड,२६ अमेरिकन म्युझिक अॅवॉर्ड आणि ग्रॅमी लाईफटाईम अचीव्हमेंट अॅवॉर्ड देखी माइकल जॅक्सनने पटकावले होते. पण १९९३ साल त्याच्या आयुष्यामध्ये मोठं संकट घेऊन आलं. आजच २४ ऑगस्ट रोजी माइकल जॅक्सनवर लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर लागला होता.(Michel Jackson History of sexual abuse accusations know the all deets)

Michel Jackson History of sexual abuse accusations know the all deets
Taarak Mehta:'शैलेश लोढांना कोण करणार रीप्लेस?';निर्माते म्हणाले,'मी स्वतः...'

१९९३ सालानं माइकल जॅक्सनच्या आयुष्याला हादरवून सोडलं. याच सालात जॅक्सनवर १३ वर्षाच्या मुलावर यौन शोषण केल्याचा आरोप लागला होता. हा आरोप झाल्यानंतर केवळ माइकल जॅक्सनच नाही तर जगभरातील त्याच्या चाहत्यांना धक्का लागला होता. न्यूयॉर्क टाईम्सच्या रीपोर्टनुसार १४ सप्टेंबरला माइकल जॅक्सन जेव्हा मॉस्कोच्या टूरवर होता तेव्हा एका मुलाच्या पालकांनी पॉप स्टारवर केस दाखल केल्याचं समोर आलं. माइकल जॅक्सनवर आरोप लावला गेला होता की, त्याने अनेकदा त्या मुलाचे लैंगिक शोषण केले आहे.

Michel Jackson History of sexual abuse accusations know the all deets
Don 3: प्रियंकाचा पत्ता कट,'ही' मराठमोळी अभिनेत्री बनणार शाहरुखची रोमा?

२८ फेब्रुवारी २००५ ला जॅक्सनच्या केसची ट्रायल सुरू झाली. केस दरम्यान माइकल जॅक्सनवर कथित आरोप लावण्यात आला की माइकल जॅक्सनने त्या १३ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केलं. त्या मुलाच्या भावानं यासंदर्भात दुजोरा दिला. अर्थात त्यावेळी माइकल जॅक्सनने त्याच्यावर लागलेल्या सगळ्या आरोपांचे खंडन केले होते. जॅक्सन म्हणाला होता की,''मी कोणताच अपराध केलेला नाही''. जॅक्सनवर लावलेले ते आरोप सिद्ध झाले नव्हते. १३ जून,२००५ रोजी माइकल जॅक्सन या आरोपातून सहीसलामत बाहेर पडला. यानंतर ४ वर्षांनी २५ जून,२००९ रोजी माइकल जॅक्सनचा मृत्यू झाला.

Michel Jackson History of sexual abuse accusations know the all deets
'बॉयकॉट ट्रेन्डचं प्लॅनिंग बॉलीवूडमधील...' मंदाकिनीचा खळबळजनक खुलासा

माहितीसाठी इथे सांगतो की, माइकल जॅक्सनवर बनलेली डॉक्युमेंट्री देखील वादात सापडली होती. त्यानंतर डॉक्युमेंट्री संदर्भात माइकल जॅक्सनच्या मुलीची प्रतिक्रिया समोर आली होती. माइकल जॅक्सनची मुलगी पेरिस जॅक्सन म्हणाली होती की,''माझे वडील लैंगिक शोषणाच्या केसमध्ये निर्दोष सिद्ध झाले आहेत''. तिने लोकांनाही आवाहन केलं होतं की, कोणाच्याही संदर्भात चुकीची समजुत करण्याआधी एकदा नीट विचार करा. तिनं हे देखील म्हटलं होतं की,ही डॉक्युमेंट्री मुद्दामहून तिच्या वडीलांच्या विरोधात बनवली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.