गायक मिका सिंग आणि स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमार आर खान यांच्यातील वाद सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता मिका सिंह गुरुवारी चक्क केआरकेच्या घरासमोर पोहोचला. यावेळी मिकाने केआरकेला 'माझा मुलगा' असं म्हटलं आणि आमच्यात कोणताही वाद नसल्याचंही स्पष्ट केलं. विविध फॅन क्लब्सकडून सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत केआरकेच्या घराबाहेर उभा राहून मिका सिंग हा माध्यमांशी बोलताना दिसत आहे. केआरकेने त्याच्या घराबाहेरील नावाची पाटी काढल्याचंही मिकाने म्हटलं.(Mika Singh reaches Kamaal R Khan house promises not to beat him up)
मिका केआरकेच्या घरी गेला आणि त्यानंतर त्याने त्याच्या घरासमोर माध्यमांशी संवाद साधला. मिकाच्या एका फॅन क्लबने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, केआरकेच्या घरा खाली मिका उभा आहे आणि पत्रकारांसोबत संवाद साधत आहे. यावेळी मिका सिंग म्हणाला, 'हे बघ भावा, मी तुझ्या घराबाहेर उभा आहे. तू जिथे म्हणशील तिथे मी तुला भेटायला तयार आहे. तू आयुष्यभर माझा मुलगाच असशील. माझे तुझ्यासोबत कोणतेच वैयक्तिक भांडण नाही. मला घाबरू नकोस. मी तुला मारणार नाही. तुला धडा शिकवायचा होता.'
काही दिवसांपूर्वी मिका सिंगचा केआरके विरोधातील व्हिडीओ पाहून अभिनेत्री आकांक्षा पुरीने ट्विट केले होते. आकांक्षाने ट्विटमध्ये लिहिले की, 'सलमान खानच्या 'राधे' चित्रपटाविषयी डिप्लोमॅटिक न होता व्यक्त झाल्यामुळे मिका सिंग तुमचे मनापासून आभार. प्रत्येक समिक्षकाला चांगला किंवा वाईट रिव्ह्यू देण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मात्र, कोणावरही वैयक्तिक टीका करणं योग्य नाही. आपण खरंच त्यांना समिक्षक म्हणू शकतो का?' केआरकेने सलमान खानच्या 'बीईंग ह्युमन' या संस्थेवरून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यामुळे सलमानने त्याला मानहानीची नोटीस बजावली होती. याच वादात नंतर मिका सिंगने उडी घेतली आणि त्याने केआरकेवर टीका केली. सध्या सोशल मीडियावर केआरके आणि मिका सिंग यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.