Mika Singh: अंबानींच्या सोहळ्यात मीका सिंगचीच चर्चा, इतके करोड घेत केलं अनंत आणि राधिकाचं स्वागत..

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याच्या पार्टीत बॉलीवूडकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती.
Mika Singh Welcome anant ambani and radhika merchant,charged big amount
Mika Singh Welcome anant ambani and radhika merchant,charged big amountEsakal
Updated on

Mika Singh: दिग्गज व्यावसायिक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा गुरुवारी,२९ डिसेंबर २०२२ रोजी पार पडला. ज्यांनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये जल्लोषाचं वातावरण पहायला मिळालं. राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दोघे जेव्हा मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांचे मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केले गेले.(Mika Singh Welcome anant ambani and radhika merchant,charged big amount)

Mika Singh Welcome anant ambani and radhika merchant,charged big amount
Vivek Agnihotri नी उडवली 'पठाण'ची खिल्ली, व्हिडीओ शेअर करत शाहरुखची इज्जतच काढली...

तसंच,संध्याकाळी एंटीलियामध्ये पार्टीचेही आयोजन केले होते,ज्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. एंटीलियात अनंत आणि राधिका यांच्या स्वागतासाठी मीका सिंगनं उपस्थिती दर्शवली होती,ज्यासाठी त्यानं तगडी फी घेतल्याचं समोर आलं आहे.

Mika Singh Welcome anant ambani and radhika merchant,charged big amount
Pathaan च्या विरोधात बोलणं अग्निहोत्रींना पडलं महाग..व्हायरल झाले मुलीचे भगव्या बिकिनीतील फोटो

अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे मुबंईत ग्रॅन्ड वेलकम केले गेले. दोघे जेव्हा पार्टीसाठी एंटीलियाला पोहोचले तेव्हा जल्लोषाच्या वातावरणात त्यांचे स्वागत केले गेले. या खास क्षणी मीका सिंगनं देखील हजेरी लावली होती आणि धमाकेदार अंदाजात त्यानं कपलचं स्वागत केलं आणि वातावरणात उत्साह संचारला. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार,मीका सिंगने या दहा मिनिटाच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल १.५ करोड रुपये आकारले होते. सोशल मीडियावर मीकाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

राधिका आणि अनंत अंबानी यांचा साखरपुडा राजस्थानमधील श्रीनाथजी मंदीरात पार पडला. त्यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. अनंत आणि राधिका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

अनंतनं अमेरिकेच्या ब्राऊन विश्वविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे तर रिलायन्स इंडस्ट्रीत जियो आणि रिलायन्स रिटेल वेंचर्सवर बोर्ड सदस्यच्या रुपात त्यानं विविध पदांवर काम केलं आहे. सध्या तो आरआईएल चा प्रमुख म्हणून काम पाहतो आहे.

तर राधिका न्यूयॉर्क विश्वविद्यालयात शिकली आहे आणि एनकोर हेल्थकेअर बोर्डाची संचालक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()