Aai Kuthe Kay Karte: रात्रभर जागायचं आणि पहाटे झोपायचं.. मिलिंद गवळी यांनी सांगितलं मनातलं दुःख

आई कुठे काय करते मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे
milind gawali, milind gawali news, aai kuthe kay karte news
milind gawali, milind gawali news, aai kuthe kay karte newsSAKAL
Updated on

Milind Gawali News: आई कुठे काय करते मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. मालिकेत नुकतंच अरुंधती - आशुतोष यांचं लग्न झालंय. या लावला अनिरुद्धने कडाडून विरोध केला.

तरी अरुंधतीने कोणाचाही विरोध न जुमानता आशुतोषशी धुमधडाक्यात लग्न केलं.

अनिरुद्ध फेम मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. मिलिंद गवळी यांचे फोटो आणि कॅप्शन वाचण्यासारखे असतात.

(milind gawali latest post viral on sunrise aai kuthe kay karte)

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

नुकतंच मिलिंद गवळी यांनी आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरचा एक फोटो शेयर केलाय.

या फोटोखाली मिलिंद गवळी लिहितात.."प्रत्येकाच्या आयुष्यात सूर्योदय दररोज एक नवी आशा नवी आकांक्षा घेऊनच येतो, सूर्योदय हा कधीही भेदभाव करत नाही, लहान मोठा गरीब श्रीमंत, सूर्योदयाच्या किरणांसाठी सगळे सारखेच, न चुकता न विसरता तो सगळ्यांसाठी दररोज उगवत असतो,

milind gawali, milind gawali news, aai kuthe kay karte news
Sharad Ponkshe: भोगा कर्माची फळं.. शरद पोंक्षे यांची राहुल गांधींवर जहरी टीका

मिलिंद गवळी पुढे लिहितात.. "पण काही दुर्दैवी असतात जे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठू शकत नाहीत, काही मुलांनी तर सूर्योदय पाहिलेलाच नाही, रात्रभर जागायचं आणि पहाटे झोपायचं, मग काय शरीरामध्ये Vitamin D Deficiency.

ठीक आहे ना deficiency झाली तर झाली. तसं ही काय फरक पडतो लोकांना ,टेक्नॉलॉजी वाढली आहे सगळे उपाय आपल्याकडे. जाऊदे हा विषय नको बोलू या.

milind gawali, milind gawali news, aai kuthe kay karte news
Aarya Ambekar: काय तुझी अदा, काय तुझं देखणं रूप, सगळं कसं एकदम ओके

मिलिंद गवळी नववर्षाच्या पहिल्या सूर्योदयाबद्दल लिहितात.. माझा सांगायचा मुद्दा हा आहे. खरंच सूर्योदयाच्या वेळे सारखा सुंदर क्षण दुसरा कुठला असू शकत नाही..

परवा cameraman आशय त्याचा कॅमेरा घेऊन साडेसहा वाजता सेटवर हजर होता, समीर म्हात्रे यांनी माझा मेकअप केला होता , दर्शनानेतयार केलेले सुंदर costume हॅन्ड पेंटेड कुर्ता धोतर आणि त्याच्यावर सुंदर शीला, मी पण तयारच होतो,आणि नववर्षाच्या सूर्योदयाची पहिली किरण चेहऱ्यावर पडली, अशाने आपला कॅमेरा क्लिक केला.

डिस्प्ले वर त्यांनी मला तो फोटो दाखवला, स्वतःचाच फोटो बघून मलाही छान वाटलं. या सूर्योदयाच्या प्रकाशाला गोल्डन लाईट उगाचच नाही म्हणत.. अशी पोस्ट लिहीत मिलिंद गवळी यांनी सूर्योदयाचं महत्व पटवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()