Milind Gawali: 'तेव्हापासून माझी फटाके वाजवायची इच्छाच निघून गेली...', दिवाळीला मिलिंदची भावूक पोस्ट

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेता मिलिंद गवळीनं आपल्या लहानपणीची एक आठवण दिवाळी निमित्तानं शेअर केली आहे.
Milind Gawali Post On Diwali, Marathi actor Post,Aai Kuthe Kay Karte
Milind Gawali Post On Diwali, Marathi actor Post,Aai Kuthe Kay KarteInstagram
Updated on

Milind Gawali: दिवाळी निमित्त काही मालिका-सिनेमांच्या शूटिंगला आराम असला तरी अनेक ठिकाणचं शूटिंग सुरु आहे. अनेक बॉलीवूड-मराठी इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो-व्हिडीओ शेअर केल्यानं सेलिब्रिटी दिवाळीचा आनंदही सर्वसामान्य कलाकारांना अनुभवता येत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या दिवाळीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. यातल्या एका सेलिब्रिटीच्या पोस्टनं मात्र आज दिवाळीला अनेक चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. ही पोस्ट आहे मिलिंद गवळीची. मिलिंदने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपल्या आयुष्यातील एक भावुक आठवण शेअर केली आहे. (Milind Gawali Post On Diwali, Marathi actor Post,Aai Kuthe Kay Karte)

Milind Gawali Post On Diwali, Marathi actor Post,Aai Kuthe Kay Karte
Drishyam 2: उरले फक्त ४८ तास! 'या' भन्नाट ऑफरसह सिनेमाचं तिकीट आत्ताच बूक करा...

'आई कुठे काय करते' चा अनिरुद्ध म्हणून जरी मिलिंद गवळी आज घराघरात ओळखला जात असला तरी एकेकाळी मराठी-हिंदी मालिका,सिनेमात काम करत मिलिंदनं अनेक फिमेल फॅन्सना आपल्या हॅन्डसम लूकनं वेड लावलं होतं. मिलिंदनं अनेक मराठी सिनेमातून साकारलेल्या भूमिका ग्रामीण प्रेक्षकांत खूप पसंत केल्या गेल्या. आज 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध ही मालिका साकारुन भले लोकांचा राग त्यानं ओढवला असला तरी त्याच्या भूमिकेनं तो चर्चेत मात्र जोरदार आहे. मिलिंद सोशल मीडियावर अनेक विषयांच्या माध्यातून व्यक्त होताना दिसतो. दिवाळी निमित्तानं त्यानं लोकांना सुरक्षित दिवाळी साजरी करा हा संदेश देताना आपल्या आयुष्यातील दिवाळीची एक भावूक आठवण शेअर केली आहे. ही आठवण अर्थातच त्याच्या आईची आहे. काय लिहिलंय नेमकं मिलिंदनं त्याच्या पोस्टमध्ये...चला जाणून घेऊया.

मिलिंद गवळीनं त्याच्य पोस्टमध्ये म्हटलंय,''शुभ दीपावली

घराच्या बाहेर पडताना मास्क लावायला सुरुवात करा, फटाक्यातल्या दारूच्या धुराने प्रचंड वायू प्रदूषण होतं, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, शहरांमध्ये वायु प्रदूषण प्रचंड प्रमाणात आहे त्यात या फटाक्याच्या दारूगोळ्यामुळे फेपड्यांचे आजार होतात, जास्ती करून लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना,

दीपावली , दिवाळी हा सण दिव्यांचा सण आहे, दिवे लावा कंदी लावा, वायु प्रदूषण करणारे किंवा ध्वनी प्रदूषण करणारे फटाके काय वाजवतय?

मलाही लहानपणी फटाक्यांचे फार वेड होतं, इतकं की मी पाचवीत असताना माझी आई पोटाच्या आजारामुळे केईएम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती, माझे वडील मला घेऊन केईएम ला तिला भेटायला घेऊन गेले, दिवाळीचे दिवस होते, माझी आई बेडवर झोपली होती, मी आईजवळ गेलो, आणि तिला म्हणालो की पप्पांनी मला फटाके घेऊन दिले नाहीत तू सांग त्यांना मला फटाके विकत घेऊन द्यायला, तीने वडीलांना सांगितलं की घरी जाताना त्याला फटाके घेऊन द्या.

या परिस्थितीत सुद्धा केइम हॉस्पिटल मधनं वडिलांनी मला फटाक्याच्या दुकानात नेलं आणि म्हणाले "घे तुला काय फटाके घ्यायचे ते", मी फटाके घेतले पण नंतर मला या गोष्टीचा खूप वाईट वाटलं कि माझी आई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना मी तिच्याकडे फटाक्यासाठी हट्ट केला, आजही ते आठवलं तरी मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि त्रास ही होतो'',

Milind Gawali Post On Diwali, Marathi actor Post,Aai Kuthe Kay Karte
Nysa Devgn: दिवाळी पार्टीत गोल्डन लेहेंग्यात गोडच दिसली न्यासा देवगण, मग नेटकरी का करु लागलेयत ट्रोल?

''तेव्हा पासून आज पर्यंत माझी फटाके वाजवायची इच्छा निघून गेली आहे,

तुमच्या आयुष्यात दिवाळीच्या काही गोड आंबट तिखट आठवणी असतीलच,

चकल्या करंज्या लाडू चिवडा शेव आणि सगळ्यात कठीण पदार्थ म्हणजे अनारसे यांच्या वर्षानुवर्षाच्या आठवणी असतीलच, काहींच्या घरी अजूनही हे पदार्थ बनत असतील, खमंग वास पसरला असेल, काहीं कडे बाहेरून घरगुती पद्धतीचं फराळ मागवला असेल.

दिवाळी हा खूप छान सण आहे आपण छान पद्धतीने साजरा करूया. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()