Milind Gawali: शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर... मिलींद गवळींनी मांडला नवा विचार

मिलींद गवळींनी लोहगडावर गेले होते. तिथे गेल्यावर त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल विचार मांडले आहेत
milind gawali post on lohgad killa and chhatrapati shivaji maharaj
milind gawali post on lohgad killa and chhatrapati shivaji maharaj SAKAL
Updated on

आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलींद गवळी हे सोशल मीडियावर चर्चेत असतात. मिलींद गवळी कायम विविध विषयांवर पोस्ट करत असतात. मिलींग गवळी नुकतेच लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी गडावर चढतानाचे व्हिडीओ पोस्ट करुन एक खास विचार सर्वांसोबत शेअर केलाय.

मिलींद गवळी लिहीतात, “लोहगड” परवा हा गड चढायचा योग आला. खूप छान वाटलं, आपल्याला गड चढता येतो याचं एक वेगळं समाधान असतं, उंच डोंगर चढणं काय साधी गोष्ट नसते, आपण जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला धाप लागत असते, काही लोक थांबत थांबत चढता , तर काहींचा स्टॅमिना चांगला असतो , ते एका दमात तो गड चढायचा प्रयत्न करतात,
दररोज व्यायाम म्हणून गड चढणारे लोक पण आहेत."

(milind gawali post on chhatrapati shivaji maharaj)

milind gawali post on lohgad killa and chhatrapati shivaji maharaj
India Vs Australia CWC 2023: या कलाकारांच्या परफॉर्मन्सने वाढणार वर्ल्डकप फायनलची शान

मिलींद गवळी पुढे लिहीतात, "एकदा का आपण गडावर पोचलो की एक वेगळं समाधान मिळतं, वेगळीच शांती मिळते,
माझ्याबरोबर “ Zen “आमचा कुत्रा होता , तो एका दमात वरती धावत सुटला, त्याचा स्टॅमिना बघून मला त्याचा हेवा वाटला, असं वाटलं की आपल्या मध्ये सुद्धा अशी ताकद असायला हवी."

मिलींद गवळींनी पुढे मनातले विचार सांगितले, "वरती पोहोचल्यावर डोक्यामध्ये असंख्य विचार येत होते, ते विचार असे होते की जर शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर तो वर्गामध्ये बसून न शिकवतात जर आपण गडावरच मुलांना घेऊन गेलो आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला तर तो त्यांच्या कायमस्वरूपी मनामध्ये घर करून बसेल आणि महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोचतील,
जसं रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली , एक वेगळी शिक्षण पद्धती तयार केली तशीच आपण का नाही तयार करू शकत."

मिलींद गवळी शेवटी लिहीतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले
पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड.
या सगळ्या गडांवर/ किल्ल्यांवर जर मुलांसाठी शाळा सुरू केल्या,
आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला, तर मला नाही वाटत की या जन्मात ती मुलं कधी आपला महान इतिहास विसरतील. आत्ताच्या आळशी इंटरनेट शिक्षण पद्धतीतून त्यांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना गड चढायला लावणे आणि गडावर इतिहास शिकवणे हा एक छान पर्याय मला सुचतो आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.