Milind Gawali:निधनापूर्वी अभिनेते अरुण सरनाईकांनी मिलिंदला दिलेलं वचन..अनेक वर्षांनी भावूक पोस्ट करत मिलिंद झाला व्यक्त

२१ जून १९८४ रोजी प्रसिद्ध अभिनेते अरुण सरनाईक यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला होता,ज्यात ते स्वतः,त्यांची पत्नी तसंच मुलगा यांचे निधन झाले होते.
Milind Gawali Post
Milind Gawali PostEsakal
Updated on

Milind Gawali: अभिनेता मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर आठवणीतले काही किस्से शेअर करताना दिसतो. मिलिंदच्या पोस्ट वाचल्या की 'आई कुठे काय करते' मालिकेत तो रंगवत असलेल्या अनिरुद्ध वरचा लोकांचा राग कसा पटकन निघून जातो. कारण प्रत्यक्ष आयुष्यात मिलिंद अनिरुद्ध या आपल्या व्यक्तीरेखेच्या एकदम विरोधी आहे.

अर्थात हे स्वतः मिलिंद गवळीनेच अनेकदा सांगितले आहे. मिलंद गवळीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे,ज्यात त्यानं अरुण सरनाईक यांच्या अपघाताची दुःखद आठवण शेअर केली आहे. ज्यात निधनापूर्वी अरुण सरनाईक यांनी त्याला एक वचन दिलं होतं ते अधूरंच राहिलं म्हटलं आहे.

'तेजाब' मधील एक गाणं कानावर पडलं आणि आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या असं मिलिंदनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणाला आहे मिलिंद. (Milind Gawali Post share memory of actor arun saranaik)

मिलिंद गवळीनं पोस्ट केली आहे त्यात लिहिलंय,''गायक नितीन मुकेश
यांनी माझ्या पहिल्या चित्रपटासाठी माझ्यासाठी पार्श्वगायन केलं होतं चित्रपटाचे नाव होतं “वक्त से पहिले”
या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं गोविंद सरय्या यांनी,
गोविंद सरय्या म्हणजे ज्यांनी नूतनचा golden jubilee सिनेमा सरस्वतीचंद्र दिग्दर्शित केला होता,
मला त्यांनी “ वक्त से पहले “या चित्रपटासाठी नायक म्हणून निवडलं होतं, या चित्रपटाची नायिका होती जयंत सावरकर यांची कन्या सुपर्णा , या चित्रपटांत पल्लवी जोशी आणि निवेदिता सराफ सुद्धा नायिकेसाठी consider केल्या होत्या,
तो काळ होता 1984 चा, सगळ्यांचीच सुरुवात होती,
श्रेष्ठ गायक मुकेश यांचा चिरंजीव नितीन मुकेश याला गोविंद सर यांनी त्या गाणं गायची संधी दिली होती'',

“वक्त से पहले “या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या चित्रपटांमध्ये मराठीचे दिग्गज हिरो “अरुण सरनाईक” हे सुद्धा काम करत होते. लहानपणापासून त्यांना बघत बघत आम्ही मोठे झालो होतो, त्यांनी गायलेलं “पप्पा सांगा कोणाचे मम्मी सांगा कोणाची” प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्यासह हे गाणं अजूनही तितकच मधुर आणि फ्रेश nostalgic
वाटतं,
काल “ तेजाब “मधलं नितीन मुकेश यांचं गाणं कानावर पडलं, आणि “ वक्त से पहले “से दिवस आठवले, नितीन मुकेश आठवला , अरुण सरनाईक आठवले ,गोविंद सरय आठवले
अरुण सरनाईकांचे १६ जून १९८४ चे त्यांचे ते शब्द आठवले की “ राजा पुढच्या आठवड्यात कोल्हापूर वरून मुंबईत येणार आहे तेव्हा मी तुझ्या घरी नक्की येतो “
आणि 21 जून 1984 ला पंढरीची वारी शूटिंग करण्यासाठी कोल्हापूर वरून पुण्याला येत असताना त्यांच्या गाडीचा एक्सीडेंट झाला, जाते त्यांची पत्नी आणि मुलगा गेले.
आणि माझ्या घरी त्यांचं येणार राहून गेला.
आयुष्यामध्ये फक्त आठवणी मागे राहतात, ज्या वेळेला आपण जुनी गाणी ऐकतो , तेव्हा त्या गाण्याबरोबर अनेक आठवणी जाग्या होतात...'',

Milind Gawali Post
Priya Bapat: 'तुला पाहून मला 'हास्यजत्रे'तला सावत्या आठवला..'

मिलिंद गवळीनं अरुण सरनाईक यांची आठवण काढली तर प्रेक्षक म्हणून तुम्हा-आम्हाला देखील त्यांचे जुने सिनेमे..जे आजही आवडीनं टी.व्ही वर पाहिले जातात ते आठवले असतील नाही का. अरुण सरनाईक फक्त अभिनेते नव्हते तर उत्तम गायकही होते. त्यांचे 'पप्पा सांगा कुणाचे' हे गाणं तर आजच्या लहान मुलांच्याही फेव्हरेट गाण्यांच्या लिस्टमधलं एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.