Aai Kuthe Kay Karte: "तो सिन कसा होईल हे कोणालाच ठाऊक नसायचं", मिलिंद गवळींनी सांगितला शुटींगचा अनुभव

आई कुठे काय करते मालिकेतील मिलिंद गवळींनी अनुभव सांगितला आहे
milind gawali shared post and shooting experience of aai kuthe kay karte
milind gawali shared post and shooting experience of aai kuthe kay karte SAKAL
Updated on

आई कुठे काय करते मालिका TRP मध्ये कायमच टॉपला असते. मालिकेने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. आई कुठे काय करते मालिकेत अनघा आणि अभीची मुलगी जानकी दिसते.

अशातच आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धची भुमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळींनी छोट्या जानकी म्हणजेच त्विशा सोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

(milind gawali shared post and shooting experience of aai kuthe kay karte)

milind gawali shared post and shooting experience of aai kuthe kay karte
Hostel Days 4: मजा, मैत्री अन् खूप काही! सुंदर प्रवासाचा अद्भूत शेवट, हॉस्टेल डेज 4 चा ट्रेलर भेटीला

मिलिंद गवळी लिहीतात, “त्विशा “ म्हणजेच आमच्या “आई कुठे काय करते “ या मालिके मधलं छोटसं पिल्लू “जानकी”. अगदीच काही महिन्याची असताना ती आमच्या सिरीयल मध्ये आली, अगदी एखाद्या घरामध्ये लहान बाळ जन्माला येतं
तसंच सगळ्यांना वाटतं .. आणि आपल्या घरामध्ये कसं लहान मुलाच्या खाण्यापिण्याच्या झोपायच्या वेळा सगळं सांभाळल्या जातात, तसंच त्विशाच्या बाबतीतही अगदी तसंच सगळं पाळलं जातं, मधेच एखादा असिस्टंट धावत यायचा कि त्विशा आता उठली आहे , आता ती छान खेळते आहे, मग बाकीचे जे शूटिंग चालू असायचं ते थांबून तिच्या सिनच शूटिंग सुरू करायचं,

milind gawali shared post and shooting experience of aai kuthe kay karte
Lalbaugcha Raja: तु VIP बाबा पण आम्हाला... स्वप्निलने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; मात्र नेटकऱ्यांना वेगळीच खंत

मिलिंद गवळी पुढे लिहीतात, "तिचीही सेटवरच्या सगळ्यांची ओळख झाली असल्यामुळे
सगळ्यांकडे ती छान पद्धतीने रमते, महिन्यात न एखाद दोन दिवस तिथे शूटिंग असायचं, आणि त्यादिवशी सेटवर एक वेगळच चैतन्य पसराचं ,
बहुतेक सगळेच प्रौढ , लहान मुलासारखं बोलायला लागायचे,
आणि ज्या सिन मध्ये ती असेल तो सिन कसा होईल हे कोणालाच ठाऊक नसायचं , कारण ती ज्या पद्धतीने ते करेल तिच्या mood असेल त्या पद्धतीनेच ते शूटिंग व्हायचं,
सिरीयल मध्ये माझ्या वाटेला तीचे सिन फार कमी आले आहेत, पण ज्या ज्या वेळेला ते आले त्या त्या वेळेला मला तो सीन करायला खूपच मजा आली, आपण शूटिंग करतो असं वाटायचं नाही लहान मुला बरोबर लहान मुलासारखा आपण खेळतोय असंच वाटायचं, खरंतर अनिरुद्ध देशमुख ला ह्या गोष्टींची फार गरज असते,"

मिलिंद शेवटी अनुभव सांगताना म्हणतात, "पण काल त्विशा बरोबर माझा सीन होता,
आणि हल्ली ती ज्या पद्धतीने धावते पळते एका जागेवर स्वस्त बसत नाही, अख्या सेट भर ती फिरत असते, कधी कधी तिला कडेवर घेऊन बसवावं लागतं, काल अचानक तिचे
“आई कुठे काय करते” मध्यले सुरुवातीचे दिवस आठवले आणि लक्षात आलं की एक वर्ष निघून गेलं , आणि कसं ते कोणाला कळलच नाही, परवा परवा पर्यंत रांगत होती मग चालायला शिकली आणि आता चक्क धावते....
लहान बाळा परमेश्वराचे रूप असतात असं म्हणतात ते काय खोटं नाही,
तिला उदंड आयुष्य यश आरोग्य आनंद सुख समृद्धी सर्व काही मिळो हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना..."

आई कुठे काय करते मालिका सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.