Milind Gawali: "कुठलाही पोलिसवाला कधीही तो पैसे खात नाही असं..." मिलींद गवळींची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींनी मुंबई पोलिस खात्याचं उदाहरण देऊन खास पोस्ट लिहीली आहे
milind gawali write post about Corruption in mumbai police branch aai kuthe kay karte
milind gawali write post about Corruption in mumbai police branch aai kuthe kay karteSAKAL
Updated on

आई कुठे काय करते मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत सध्या आरोहीचा ट्रॅक सुरु आहे. मालिकेत आपण पाहिलं की सतत इतरांना विरोध करणारा, आणि राग राग करणारा अनिरुद्ध आरोहीला न्याय देण्यासाठी सर्वांना साथ द्यायचा प्रयत्न करतो.

मिलिंद गवळी मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. अनिरुद्धच्या वागण्यात झालेला हा बदल सर्वांना आवडतोय. स्वतः मिलींद गवळींनी सुद्धा मालिकेत बदललेल्या या ट्रॅकचं सोशल मीडियावर कौतुक केलंय.

milind gawali write post about Corruption in mumbai police branch aai kuthe kay karte
Hemangi Kavi: "मी डायलॉगमध्ये बदल केल्याचं कळताच त्यांनी...", बिग बींसोबतचा अनुभव हेमांगीने सांगितला

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. "Good over Evil
अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला असा stand घेतो, त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो ?, असा प्रश्न आल्या शिवाय राहत नाही,
अनिरुद्ध च नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे, काही काही situations मध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो, surprise करतो सगळ्यांना."

मिलिंद गवळी पुढे लिहीतात, "मी पण ज्या वेळेला script वाचतो त्यावेळेला नकळत माझ्या चेहऱ्यावर एक smile येतं आणि मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात, मनातल्या मनात नमिता वर्तक हिला thank you सुद्धा म्हणत असतो, पण खरंच आहे किती वाईट माणूस असला तरी काही काही बाबतीत माणसाने ठांब भूमिका घ्यायलाच हवी , योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी,
मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे खात्यामध्ये corruption आहे, पण एखादा पोलिस वाला कितीही corrupt असला
तरी असं म्हटलं जातं की Rape ,Murder, Drink & Drive
आणि drugs या cases मध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही तो पैसे खात नाही , गुन्हेगाराला कधीही साथ देत नाही,
कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं."

milind gawali write post about Corruption in mumbai police branch aai kuthe kay karte
Tiger 3 Released Date: अखेर सलमानच्या टायगर 3 ची रिलीज डेट समोर, पहिला हिंदी सिनेमा जो रविवारी प्रदर्शित होणार

मिलिंद गवळी शेवटी लिहीतात, "या scene मध्ये ज्यावेळेला तू आरोहीची बाजू घेऊन बोलतो,
जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो,
त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्ध ची एक नव्याने ओळख होत जाते, आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुख च्या प्रेमात पडावसं वाटतं.
हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो, खरं तर माझ्या हातात काहीच नाहीये, लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात,
पण अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात, प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की आता अनिरुद्धची काय भूमिका आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.