Sulochana Latkar: त्या आल्या की खुप भव्य झाल्यासारखं व्हायचं... मिलिंद गवळी दीदींच्या आठवणीत भावुक

आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी दीदींच्या निधनाबद्दल भावुक पोस्ट लिहिली आहे
milind gawali wrote emotional post on sulochana latkar
milind gawali wrote emotional post on sulochana latkarSAKAL
Updated on

Milind Gawali Emotional Post by Sulochana Latkar: सुलोचना दीदी यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी काल रविवारी ४ मेला सायंकाळी निधन झालं. दीदींच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाने हळहळ व्यक्त केलीय.

सुलोचना दीदी यांच्यासोबत अनेक मराठी कलाकारांनी अभिनय केलाय. अनेक मराठी कलाकार दीदी जाण्याबद्दल शोक व्यक्त करत आहेत.

अशातच आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी दीदींच्या निधनाबद्दल भावुक पोस्ट लिहिली आहे.

(milind gawali wrote emotional post on sulochana latkar)

milind gawali wrote emotional post on sulochana latkar
Sulochana Latkar News: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल

मिलिंद गवळी लिहितात.. सुलोचना दीदी.. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ, निरागस अभिनयातून कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर.

मी खूप भाग्यवान आहे की मला त्यांच्याबरोबर काही काळ जगता आला, पहिल्यांदा मी सुलोचनांच्या घरी "देवकी" नावाच्या माझ्या मराठी चित्रपटाचं प्रीमियरच आमंत्रण द्यायला मी आणि माझे मित्र प्रोड्यूसर मयूर शहा गेलो होतो,

त्यांनी आमचा आमंत्रण खूप प्रेमाने स्वीकारलं आणि त्या आवर्जून त्या चित्रपट पाहण्या साठी आल्या, आणि आम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या,

मिलिंद पुढे लिहितात.. कदाचित त्यांच्याच आशीर्वादामुळे त्या चित्रपटाला 40 पेक्षा जास्त पारितोषिकं मिळाली, "सूर्योदय एक नवी पहाट" नावाच्या चित्रपटाचं निगेटिव्ह कटिंग असो,

किंवा मी एक चित्रपट "मोडेन पण वाकणार नाही" नावाचा चित्रपट दिग्दर्शित करत होतो या चित्रपटाचं मुहूर्त असो, किंवा " चिंगी "नावाच्या आमच्या चित्रपटाचा प्रीमियर असो,

सुलोचना दीदी वेळात वेळ काढून प्रत्येक वेळेला आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हजर राहील्या, त्या आल्या की आमचा कार्यक्रम हा खूप छान आणि मोठा , भव्य झाल्याचं समाधान व्हायचं..

milind gawali wrote emotional post on sulochana latkar
Bhagyashree Limaye छान छान छान मनीमाऊचं बाळ किती गोरं पान

मिलिंद गवळी शेवटी लिहितात.. खूप गोड स्वभाव , आणि नेहमी हसरा असा त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही.

आईच वात्सल्य आणि आईचं प्रेम भरभरून असल्याशिवाय का त्यांनी इतकी वर्ष सिनेमासृष्टीमध्ये आईच्या भूमिकेत लोकांच्या मनावर आधी राज्य गाजवलं,

आज त्या आपल्यात नाही आहेत पण त्यांच्या असंख्य चित्रपटातल्या अविस्मरणीय भूमिका आपल्या पाशी कायमच राहणार आहेत,

आणि माझ्यासाठी तर त्यांच्या सानिध्यात घालवलेले अतिशय आनंदाचे अनमोल क्षण माझ्या हृदयात कायम घर करून बसणार आहेत.

अशी पोस्ट करत मिलिंद गवळी यांनी दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. दीदींवर आज ५ मेला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.