Mlind Soman News: अभिनेता मिलिंद सोमणची गोष्टच वेगळी आहे. तो जे काही करतो ते सोशल मीडियावर चाहत्यांसोबत त्याला शेयर करायला आवडते. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्याचा रुबाब, त्याचं दिसणं हे कमालीचे आकर्षक (Bollywood News) आहे. सोशल मीडियावर तो त्याच्या फोटोंनी, व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. (Bollywood Actress Kangana Ranaut) नुकतीच त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सगळ्यात चर्चा आहे ती त्याच्या सॅम माणेकशा यांच्या लूकची.
येत्या काळात बॉलीवूडची क्वीन कंगनाचा इर्मजन्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा टीझर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. नेहमीप्रमाणे कंगनाच्या चाहत्यांना तिचा तो अंदाज प्रचंड आवडला. त्या चित्रपटामध्ये कंगना ही भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा मेकअप, तिची संवादशैली हे सारं कमालीचं प्रभावी असल्याचं तो टीझर पाहून प्रेक्षकांनी म्हटलं होतं. आता त्याच चित्रपटात फिल्ड मार्शल जनरल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद सोमणचा हटके लूक समोर आला आहे.
मिलिंदच्या त्या लूकवर नेटकऱ्यांनी त्याला उस्फुर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी त्या लूकवर फिदा झालं आहे तर कुणी त्याला रावडी लूक असंही म्हटलं आहे. इमर्जन्सी हा भारतातील तत्कालीन ऐतिहासिक घटनांवर आधारित असून त्याचे दिग्दर्शन कंगना करणार आहे. इंदिराजींनी 1975 ते 1977 दरम्यान देशात आणीबाणी घोषित केली होती. या एकवीस महिन्यांच्या काळातील देशाचे राजकारण, समाजकारण, यावर चित्रपटाच्या निमित्तानं भाष्य करण्यात आले आहे. त्यात 1971 च्या युद्धाचे नायक फिल्ड मार्शल माणेकशॉ यांची भूमिका मिलिंद सोमण साकारणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.
कंगनानं याविषयी सांगितलं की, माणेकशॉ हे कणखर व्यक्तिमत्व होते. ते स्पष्टवक्ते होते. या चित्रपटातून त्यांची भूमिका परखडपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ती भूमिका करण्यासाठी मिलिंदची निवड करण्यात आली असून तो त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देईल. असा विश्वास आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.