Laal Singh Chaddha वादात आता आमिर नाही,मिलिंद सोमण ट्रोलर्सच्या निशाण्यावर

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी झाल्यावर मिलिंद सोमणने ट्वीट करत आमिरला पाठिंबा दिला होता.
Milind Soman Supports Aamir Khan Movie Laal Singh Chaddha, Now Trollers Trolled him
Milind Soman Supports Aamir Khan Movie Laal Singh Chaddha, Now Trollers Trolled himGoogle
Updated on

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. करिना कपूर आणि आमिर खानचा हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. आमिरचा लाल सिंग चड्ढा सिनेमा टॉम हॅंक्सच्या फॉरेस्ट गम्प सिनेमाचा अधिकृत रीमेक आहे. हा सिनेमा आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि हेच मुख्य कारण आहे की या सिनेमाला सुपरहिट करण्यासाठी आमिर दिवरात्र मेहनत घेताना दिसत आहे. पण त्यादरम्यानच आमिरच्या या सिनेमाला बॉयकॉट करण्याच्या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे.(Milind Soman Supports Aamir Khan Movie Laal Singh Chaddha, Now Trollers Trolled him)

Milind Soman Supports Aamir Khan Movie Laal Singh Chaddha, Now Trollers Trolled him
शिल्पा हसली, काळजात रुतली...

ट्वीटरवर लाल सिंग चड्ढाचे बॉयकॉट हॅशटॅग जोरदार ट्रेंडिंगमध्ये आहे. यावरनं आता अभिनेता मिलिंद सोमणने आमिर खानला पाठिंबा दिला आहे. मिलिंद सोमणने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर ट्वीट करत म्हटलं आहे की, ''ट्रोलर्स एका चांगल्या सिनेमाचं काही बिघडवू शकत नाहीत''. मिलिंदच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Milind Soman Supports Aamir Khan Movie Laal Singh Chaddha, Now Trollers Trolled him
सुबोध भावे बोलणार, चर्चा तर होणारच!

एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की,'मिलिंद जर तुला सिनेमाचं नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर विरोधाला विनम्रतेनं सामोरं जा. करिनासारखा अहंकार दाखवू नको. प्रेक्षकांना आव्हान नको देऊस. कमीत कमी आमिरनं बॉयकॉटची मागणी जोर धरल्यानंतर विनम्रतेने प्रेक्षकांना आवाहन केलं, आणि आपली हुशारी दाखवली'.

खरंतर ही नाराजगी आमिरची पूर्वाश्रमीची बायको किरण राव हिनं काही वर्षांपूर्वी भारतात सुरक्षित वाटत नाही असं म्हटलेलं त्यावर आहे. खरंतर आमिर हे बोललाच नव्हता,आणि जी बोललेली ती त्याची आता बायकोही राहिली नाही. पण लोकांनी मात्र नाराजगीचं प्रदर्शन जोरदार केलं आहे. आमिरनं यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, ''खूप जणं म्हणत आहेत की भारत मला आवडत नाही, पण हे चुकीचं आहे. खरंतर माझं माझ्या भारतावर खूप प्रेम आहे. तेव्हा कृपा करुन माझ्या सिनेमावर बहिष्कार घालू नका. माझा सिनेमा नक्की पहा''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.