मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणाऱ्या मिलिंद सोमणने Milind Soman काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तो कशाप्रकारे काळजी घेत होता, याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तो सतत चाहत्यांना सांगत होता. कोरोनावर मात केल्यानंतर प्लाझ्मादान Plasma Donation करण्यासाठी तो मुंबईत आला. पण तो प्लाझ्मादान करू शकत नाही, असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं. यामागचं कारण म्हणजे त्याच्या शरीरात पुरेसे अँटिबॉडिज नाहीत. प्लाझ्मादान करू न शकल्याचं दु:ख मिलिंदने सोशल मीडियावर व्यक्त केलं. (Milind Soman Went to Mumbai to donate plasma but failed to do it here is why)
'प्लाझ्मा थेरेपी जरी १०० टक्के उपयुक्त नसली तरी त्यामुळे रुग्णांना फायदा होईल अशी काही मतं आहेत. त्यामुळे आपल्याला जमेल ते करावं असं मला वाटतं. पण मला डॉक्टरांनी कमी अँटिबॉडिज असल्याने प्लाझ्मादान करण्यास नकार दिला. कमी अँटिबॉडिज म्हणजेच मला सौम्य लक्षणे आहेत आणि माझं शरीर इतर संसर्गाचा सामना करू शकते. पण इतरांची मदत होण्यासाठी मी प्लाझ्मादान करू शकत नाही. मी थोडा निराश झालो', अशी पोस्ट त्याने लिहिली.
रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याआधी त्याच्यावर प्लाझ्मा थेरेपी उपयुक्त ठरू शकते. मात्र गंभीर प्रकृतीच्या रुग्णांच्या शरीरावर प्लाझ्मा थेरेपीचा उपयोग होत नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि बाहेरून द्यावा लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण २०० ते १५०च्या खाली असेल, अशाच रुग्णांचा प्लाझ्मा थेरेपी फायदेशीर असल्याचे आढळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.