शाहिदची मीरा अमेरिकेवर भडकली; झेलेन्स्कीची खिल्ली उडवणाऱ्याला म्हणाली...

मीरा राजपूत नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसते.
Mira Rajput has defended Ukrainian President Volodymyr Zelenskyy.
Mira Rajput has defended Ukrainian President Volodymyr Zelenskyy.Google
Updated on

गेल्या २४ दिवसांपासून रशिया(Russia) युक्रेन(Ukraine)वर घणाघाती बॉम्बहल्ले करीत आहे. रशियाच्या या हल्ल्यांनी युक्रेनआता मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला जातोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. आपण नुसतं टी.व्हीवर ते सारं चित्र पाहिलं तरी पायाखालची जमिन सरकल्यागत स्थिती होतेय तर विचार करा युक्रेनमध्ये सध्या काय परिस्थिती असेल. त्यांचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की आपल्या देशवासियांच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता युद्धाला सामोरं जातायत. पण या युद्धापेक्षा सध्या त्यांच्या आऊटफिटची चर्चा जास्त होताना दिसत आहे. झेलेन्स्की यांनी रशियाशी ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्या पहिल्या दिवसांपासूनच एक ऑलिव्ह ग्रीन रंगाचं टी-शर्ट घातलं आहे,ज्यावर आता अमेरिकेचे फायनान्शिअल एक्सपर्ट पीटर शीफ यांनी एक अत्यंत खालच्या दर्जाची प्रतिक्रिया दिली आहे. गम्म्त म्हणजे अमेरिकेच्या फायनान्शिअल एक्सपर्टच्या त्या ट्वीटला बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत(Mira Rajput)नं कडक शब्दात प्रतिउत्तर केलं आहे.

अमेरिकेचे फायनान्शिल एक्सपर्ट पीटर शीफ यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कपड्यांवर टीका करताना लिहिलं आहे,''मी समजू शकतो आता खूप वाईट काळ सुरू आहे. पण युक्रेनच्या राष्ट्रपतींकडे एक स्वतःचा शिवलेला सूट नाही आहे का,माझ्या मनात यू.एस कॉंग्रेसच्या सदस्यांविषयी काही फार सन्मान नाही पण तरीदेखील मी त्यांना टी शर्ट घालून संबोधित करणार नाही,कारण मला माझ्या संस्थेचा किंवा संयुक्त राज्य अमेरिकेचा अनादर करायचा नाही''.

Meera Kapoor Post Image
Meera Kapoor Post ImageGoogle

तर पीटर शीफ यांच्या पोस्टवर मीरा राजपूत मात्र भलतीच भडकलेली दिसत आहे. तिनं त्यांचं ट्वीट शेअर करत लिहिलं आहे,''तुम्हाला शक्य झालं तर त्यांना कफलिंग परिधान करायला सांगू शकता. खरंच,आपण फक्त वेशभूषेला महत्त्व देऊन भीषण वास्तवाकडे कसं दुर्लक्ष करू शकतो. आणि ते ही ज्याच्या देशावर संकट आलंय त्यानं चांगले कपडे घालून सूटबूटात वावरण्याची अशी अपेक्षा करणं खरंच लाजिरवाणं आहे''. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेकडे सहकार्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा एक ग्राफिकच्या माध्यमातून तयार केलेला व्हिडीओ देखील दाखवला होता. तसंच,मजबुरीनं युक्रेनच्या कानाकोपऱ्यातून स्वतःचं घर सोडावं लागणाऱ्या लोकांची परिस्थितीही त्या व्हिडीओतनं दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.