Miss Universe 2022 ची धुरा हिच्या एकटीच्या खांद्यावर..भयानक होतं बालपण..कोण आहे अरबपती ट्रान्सवुमन Anne?

Anne Jakkaphong Jakrajutatip ही पहिली थाई ट्रान्सजेंडर बिझनेस वुमन आहे.
Anne Jakkaphong Jakrajutatip
Anne Jakkaphong JakrajutatipInstagram
Updated on

Miss Universe 2022 : 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे,स्पर्धेच्या फिनालेकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 2022 मिस युनिव्हर्स स्पर्धे दरम्यान एक नाव मात्र जोरदार चर्चेत असलेलं पहायला मिळत आहे आणि ते म्हणजे मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या नव्या मालकीणीचं... Anne Jakkaphong Jakrajutatip हिचं. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनला अॅनीनं ऑक्टोबर 2022 मध्ये IMG Worldwide कडून 20 मिलियन डॉलर म्हणजे 163 करोडला विकत घेतलं आहे.

Anne Jakkaphong Jakrajutatip
RRR: 'गरज सरो..वैद्य मरो..',गोल्डन ग्लोब जिंकल्यावर राजामौलींंनीही बॉलीवूडला दाखवली लायकी..म्हणाले..

कोण आहे Anne?

Anne Jakaaphong Jakrajutatip ही थायलंडची बिझनेसवुमन आहे. एक काळ होता जिथे अॅनीला आपलं बालपण खूप हालाखीत काढावं लागलं. आज ४३ वर्षाची अॅनी ही Anne JKN नावानं ओळखली जाते. ती थायलंडच्या JKN Global Group ची मालकीण आहे. अॅनी एक ट्रान्सवुमन आहे. तिला 'लाइफ इन्स्पायर्ड फॉर ट्रान्स सेक्शुअल' म्हणूनही ओळखलं जातं.

Anne Jakkaphong Jakrajutatip
Alia Bhatt: मुलीच्या जन्मानंतर आयुष्यात झालेल्या बदलांवर पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलली आलिया..म्हणाली..

Anne आपल्या लहानपणी बॉइज स्कूल मध्ये शिकत होती. तिच्या जेंडर आयडेंटिटीमुळे तिच्या वर्गातील मुलं खूप त्रास द्यायचे. एवढंच नाही तर अॅनीच्या शिक्षकाकाडूनही तिचं लैंगिक शोषण झालं होतं. आणि या घटनेनंतर अॅनीनं शाळा सोडली होती. खूप कमी वयात अॅनीनं पेट्रोल पंपावर नोकरी करायला सुरुवात केली होती.

Anne Jakkaphong Jakrajutatip
Apurva Nemlekar: 'वरूण तू मला एका गोष्टीचं आश्वासन दिलं होतं.. ; अपूर्वाची पोस्ट अन् चर्चेला उधाण

Anne ने एका मुलाखतीत सांगितलं की, ती लहानपणापासूनच स्वतःला मुलगी समजायची. लहान असताना आपण आईचे कपडे घालायचो आणि मुलीसारखं दिसणं पसंत करायचो असं देखील अॅनी म्हणाली. पण तिला कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे काही काळानंतर तिनं घर सोडलं आणि पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला निघून गेली.

आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर अॅनी पुन्हा थायलंडला परतली आणि तिनं आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये मदत करायला सुरुवात केली आणि त्यानंतर अॅनीनं स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

आज तिच Anne टॉप कंटेट मॅनेजमेंट आणि डिस्ट्रीब्युशन कंपनी JKN ग्लोबल मीडियाची सीईओ आहे. Anne आपल्या मेहनतीच्या बळावर पहिली थाई ट्रान्सजेंडर बिझनेस वुमन बनली. अॅनीला 'क्वीन ऑफ इंडियन कंटेट' म्हणूनही ओळखलं जातं.कारण इंडियन टी.व्ही शोज आणि सीरिजला थाई टी.व्ही पर्यंत पोहोचवण्यात तिची खूप मोठी भूमिका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()