हरनाजच्या डोक्यावर 37 करोडचा 'मुकुट'; 'मिस युनिव्हर्स'ला मिळतात 'या' सुविधा

21 वर्षांनी हरनाजने 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट भारतात आणला.
Harnaaz Sandhu
Harnaaz SandhuEsakal
Updated on

हरनाजने संधूने (Harnaaz Sandhu) पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा (Miss Universe 2021) किताब जिंकला. तब्बल 21 वर्षांनी हरनाजने 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट भारतात (India)आणला. इस्राइलमध्ये झालेल्या या समारंभात भारताच्या हरनाजने सुंदर हिऱ्याचा मुकुट पटकावला. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स 2020 अँड्रिया मेझा (Andrea Meza) हिने हरनाजला आपला मुकूट दिला. 'मिस युनिव्हर्स ही अत्यंत प्रतिष्ठित अशी सौंदर्यस्पर्धा असते. यात कोण विजेता होणार याची उत्सुकता सर्वाना लागून राहते. याबरोबरच सौंदर्यवतीचा ताज, नेमकी स्पर्धा कशी असते , 'मिस युनिव्हर्स' ला कोणत्या सुविधा मिळतात याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकताही अनेकांना असते. यावर्षीच्या 'मिस युनिव्हर्सने आतापर्यत झालेल्या सौंदर्यस्पर्धेतील सगळ्यात महागडा ताज पटकवला होता. याची किंमत, बनवताना कोणते डायमंड वापरतात याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

सगळ्यात महागडा ताज

'मिस युनिव्हर्स २०२१ या सौंदर्यस्पर्धेत हरनाज संधूला सगळ्यात महाग ताज डोक्यावर चढवला होता. ज्याची किंमत युएस डाॅलर्सनुसार ५ मिलियन आहे. तर भारतीय चलनानुसार याची किंमत (३७ करोड रूपये ) ३७,८७९०,००० रुपये आहे. या ताजमध्ये १८ कॅरेट गोल्ड, १७७० डायमंड असतात. शिवाय मध्यभागी जो शील्ड कट असतो तो सोनेरी कॅनली डायमंडचा असतो. जो ६२.८३ कॅरेटने तयार केलेला असतो. ताजमधील पाने, पाकळ्या आणि वेलींच्या रचना सात खंडांतील समुदायांचे प्रतिनिधित्व करतात.

मिस युनिव्हर्सला काय मिळते

मिस युनिव्हर्स ही संस्था पुरस्कारात किती पैसे दिले जातात याचा खुलासा करत नाहीत. मात्र यामध्ये लाखो रूपयांचे बक्षिस दिले जाते. याचबरोबर मिस युनिव्हर्सला न्यूॅयार्कमध्ये राहण्यासाठी मिस युनिव्हर्स अपार्टमेट एका वर्षासाठी दिली जाते. ही अपार्टमेट तिला यूएसए सोबत शेअर करायची असते. यात मिस युनिव्हर्सला सर्व सुविधा दिल्या जातात.

मिस युनिव्हर्सला जग फिरण्याची मिळते सुविधा

मिस युनिव्हर्सला राहण्यासोबतच एक मेकअप आर्टिस्ट टीम दिली जाते. त्याचबरोबर एका वर्षासाठी मेकअप, हेअर प्रोडक्ट्स, शूज, कपडे, ज्वेलरी, स्किनकेअर प्रोडक्ट्स आदि दिले जातात. तिला पोर्टफोलियोसाठी फोटोग्राफर्स दिले जातात. प्रोफेशनल स्टायलिस्ट न्यूट्र‍िशन, डर्मटोलॉजी आणि डेंटल सर्व‍िस दिली जाते. विशेष कार्यक्रम, समारंभ, प्रीमियर, स्क्रीनिंग, कास्टिंगमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवासाचा खर्च, हॉटेलमध्ये राहण्याचा संपूर्ण खर्च दिला जातो. याचबरोबर त्यांना जग फिरण्यासाठी मोफत सुविधा दिली जाते. मिस युनिव्हर्सला या सुख-सुविधासोबत काही जबबादरीही पार पाडावी लागते. तिला कार्यक्रम, समारंभ, चॅरीटी, प्रेस काॅन्फरन्समध्ये संस्थेकडून चीफ अॅम्बॅसिडर म्हणून जावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()