हरनाज संधू म्हणाली,''बॉलीवूडची 'ही' अभिनेत्री माझं प्रेरणास्थान''

तब्बल २१ वर्षांनतर भारतानं 'मिस.युनिव्हर्स' हा किताब आपल्याकडे खेचून आणलाय
Harnaaz Sandhu
Harnaaz SandhuGoogle
Updated on

आज भारताच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. तब्बल २१ वर्षांनी भारतानं मानाच्या समजला जाणारा 'मिस.युनिव्हर्स' हा किताब आपल्याकडे खेचून आणला. चंदिगढच्या २१ वर्षीय हरनाज संधूनं आज तब्बल ८० देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत 'मिस.युनिव्हर्स'चा क्राऊन पटकावला. हरनाज संधूनं अगदी लहान वयात मॉडेलिंगची सुरुवात केली आहे. तिनं राज्यपातळीवरही अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन विजेतेपदक पटकावली आहेत. इतकंच नाही तर तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत याआधीच पदार्पण केले आहे. हरनाज ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.

Priyanka Chopra,Harnaaz Sandhu
Priyanka Chopra,Harnaaz SandhuGoogle

आज हरनाजनं विजेतेपद पटकावल्यावर चक्क एका बॉलीवूड अभिनेत्रीचे आभार मानल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या व्हिडीओमध्ये हरनाजनं प्रियंका चोप्राचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ जुना असला तरी हरनाजनं एक अशीच सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर प्रियंका चोप्राचे आभार मानले होते. ती म्हणाली आहे की,''मला प्रियंका खूप आवडते. तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. केवळ बॉलीवूड नाही तर हॉलीवूडमध्येही ती नाव कमावतेय. शिवाय तिनं फक्त अभिनय नाही तर गाण्यातही आपलं नाव कमावलंय. ती माझं प्रेरणास्थान आहे. मी तिच्याकडे पाहिलं की मलाही खूप मोठं काहीतरी करायची स्फूर्ती येते''.

तर प्रियंकानंही सोशल मीडियावर हरनाझ संधूनं मिस.युनिव्हर्स किताब पटकावल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. मिस युनिव्हर्स किताब जिंकण्याआधी हरनाजनं २०१७ साली 'टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगढ',२०१८ साली 'मिस मॅक्स इमर्जिंग स्टार' आणि २०१९ साली ' फेमिना मिस इंडिया पंजाब' हे किताब पटकावले आहेत. १९९४ साली सुश्मिता सेन आणि २००० साली लारा दत्तानं 'मिस. युनिव्हर्स' हा किताब पटकावल्यानंतर आता हरनाज या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.