२०१९ मध्ये 'मिस युएसए' (Miss USA) या सौंदर्यस्पर्धेचा किताब जिंकलेली चेस्ली क्रिस्टने (Cheslie Kryst) रविवारी आत्महत्या केली. चेस्ली अवघ्या ३० वर्षांची होती. ६० मजली इमारतीवरून उडी मारण्याआधी चेस्लीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. चेस्ली ही वकील, फॅशन ब्लॉगर आणि 'एक्स्ट्रा टीव्ही' या शोची सूत्रसंचालकसुद्धा होती. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. आत्महत्येपूर्वी चेस्लीने इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो पोस्ट केला होता. 'हा दिवस तुमच्या आयुष्यात आराम आणि शांतता आणू दे', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. चेस्लीच्या मृत्यूवर 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) शोक व्यक्त केला आहे.
हरनाजने इन्स्टाग्रामवर चेस्लीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. इस्रायलच्या इलात इथं पार पडलेल्या ७०व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतील हा फोटो आहे. या फोटोमध्ये हरनाज आणि चेस्ली मनसोक्त हसताना दिसत आहेत. 'हे अत्यंत हृदयद्रावक आणि अविश्वसनीय आहे. तू नेहमीच अनेकांसाठी प्रेरणास्थान होतीस. तुझ्या आत्म्याला शांती मिळो', अशा शब्दांत हरनाजने शोक व्यक्त केला.
चेस्लीने ज्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली, त्याच इमारतीच्या नवव्या मजल्यावर ती राहत होती. १९९१ मध्ये मिशिगनमध्ये तिचा जन्म झाला होता. दक्षिण कॅरोलिनामध्ये ती लहानाची मोठी झाली होती. तिने दक्षिण कॅरोलिना विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि २०१७ मध्ये वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून पदवी प्राप्त केली. तिने नॉर्थ कॅरोलिना फर्म Poyner Spruill LLP येथे दिवाणी वकील म्हणून काम केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.