'Mission Impossible 7' ने तोडले बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड; भारतात केली 'एवढी' कमाई

या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे रेकॉर्ड तोडले!
'Mission Impossible 7'
'Mission Impossible 7'sakal
Updated on

Mission Impossible 7 : 'मिशन इम्पॉसिबल 7' हा हॉलिवूड चित्रपट जगभरातील तसेच भारतातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात सुपरस्टार टॉम क्रूझ दमदार ॲक्शन करताना दिसला होता. 12 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

हॉलिवूड स्टार टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल 7' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. चित्रपटाचे पूर्ण नाव 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट 1' असं आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.

भारतात केली एवढी कमाई

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 12.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. टॉम क्रूझचा मागील चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल फॉलआउट' 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 9.25 कोटींची ओपनिंग केली होती. त्यानंतर नवीन भागाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे.

5 दिवसात 2000 कोटी कमवणार?

वैराईटीच्या अहवालानुसार, 'मिशन इम्पॉसिबल 7' हा चित्रपट उत्तर अमेरिकेत सुमारे 698 ते 740 कोटी रुपये कमाई करणार असल्याची शक्यता आहे. त्यानुसार, रिलीजच्या पहिल्या 5 दिवसांत त्याचे आंतरराष्ट्रीय कलेक्शन हे 160 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1313 कोटी रुपये होतो. यामुळे, चित्रपटाची ग्लोबल ओपनिंग 250 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 2051 कोटी असू शकते.

काय आहे मिशन इम्पॉसिबल ७ ची कथा?

चित्रपटाची कथा टॉम च्या इथन हंट या व्यक्तिरेखेवर आधारित आहे, जो आणखी एक अशक्य मिशन पूर्ण करण्यासाठी बाहेर पडला आहे. इथनला चावी शोधण्याचे काम सोपवले आहे. इथन आणि त्याच्या टीमला या गूढ किल्लीच्या शोधात अनेक अडचणी येतात. 'मिशन इम्पॉसिबल 7' चे दिग्दर्शक क्रिस्टोफर मक्क्वेरी हे आहेत. यात टॉम क्रूझसोबत हेली एटवेल, रेबेका फर्ग्युसन आणि वेनेसा किर्बी यांच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()