Mission Raniganj song Keemti: अक्षयसोबत रोमान्स करताना दिसली परिणीती! 'मिशन राणीगंज'चं नवं गाणं रिलिज

Mission Raniganj song Keemti:
Mission Raniganj song Keemti:
Updated on

Mission Raniganj song Keemti: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. गेल्या महिन्यात त्याचा ओएमजी 2 नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

त्यानंतर अक्षय कुमार हा त्याच्या आगामी 'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहेत.

Mission Raniganj song Keemti:
Bigg Boss 17 House: असं असेल बिग बॉसच्या 17 व्या सिझनचं आलिशान घर! व्हिडिओ व्हायरल

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्रा ही मुख्य भुमिकेत दिसणार आहे. केसरी नंतर या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली येणार आहे. तर परिणीतीसाठीही हा चित्रपट खुप खास आहे.

कारण राघव चढ्ढासोबत लग्न झाल्यानंतर 'मिशन रानीगंज' हा तिचा पहिलाच चित्रपट असणार आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला होता.

तर चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आल्यानंतर हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला. आता या सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Mission Raniganj song Keemti:
Urfi Javed Engagement: उर्फी जावेदनं गुपचूप उरकला साखरपुडा? फोटो व्हायरल

निर्मात्यांनी मंगळवारी 'मिशन राणीगंज'चे नवीन गाणे 'किमती' हे रिलीज केले आहे. यात अक्षय परिणीतीसोबत रोमांस करताना दिसत आहे.

विशाल मिश्राने 'कीमाती' हे गाणं गायलं असून कौशल किशोरने ते लिहिलं आहे. हे गाणं प्रेक्षकाच्या पसंतीस पडत असून या गाण्यालाही केसरी मधल्या 'वे माही' प्रमाणे प्रेक्षकांचे प्रेम मिळते की नाही हे पहावं लागेल.

Mission Raniganj song Keemti:
Fukrey 3 Box Office Collection: 5 दिवसात फुकरे सुसाट! हाफ सेंच्युरी करत भोली अन् चुचाच्या जोडीनं लावलं प्रेक्षकांना वेड!

'मिशन रानीगंज' या चित्रपटात एकूण 5 गाणी आहेत, ज्यात 'जलसा 2.0', 'जीतेंगे', 'किमती', 'नानक नाम जहाज है' आणि 'जीतेंगे 2.0' ही गाणी असणार आहे.

टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित या चित्रपटाची कथा दीपक किंगराणी आणि पूनम गिल यांनी लिहिली आहे. 'मिशन राणीगंज' 6 ऑक्टोबरला रोजी प्रदर्शित होणार आहे.

एका दगडी कोळशाच्या खाणीत अडकून बसलेल्या कामगारांना काढण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जसवंत सिंह या इंजिनिअरची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.